दिपांकर भट्ट, देहरादून, 29 एप्रिल: कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी (Coronavirus in India) याहीवर्षी अनेक यात्रा, उत्सव रद्द करण्यात येत आहेत. गेल्यावर्षी देखील लॉकडाऊनमध्ये (Lockdown 2020) भाविकांची नाराजी पाहायला मिळाली होती. यंदाही त्याच घटनांची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. मात्र कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी खबरदारी म्हणून विविध राज्य सरकारकडून हे महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (CM Tirath Singh Rawat) यांनी चार धाम यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याठिकाणी केवळ पूजा होणार असल्याची माहिती रावत यांनी दिली आहे. तीरथ सिंह रावत यांनी अशी माहिती दिली आहे की, कोव्हिड काळामध्ये यात्र आयोजित करणं शक्य नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 14 मे रोजी यमुनोत्री मंदिराचे दरवाजे उघडणार होते, गेल्या वर्षीही उत्तराखंड सरकारने मे महिन्यात चार धाम यात्रा कोरोना साथीच्या आजारामुळे थांबविली होती. यानंतर राज्य सरकारने भाविकांसाठी 1 जुलैपासून चार धाम यात्रा सुरू केली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्य सरकारने इतर राज्यातील भाविकांना काही अटींसह चार धाम यात्रेसाठी परवानगी दिली होती.
(हे वाचा- Oxygen Crisis: टाटांनी पुन्हा वाढवला ऑक्सिजनच पुरवठा,600 टन ऐवजी पुरवणार 800 टन ) यामुळे हॉटेल व्यवसायाला देखील मोठा फटका बसण्याची शक्यकता आहे. कारण अनेकांनी या यात्रेसाठी प्रीबुकिंग केलं होतं, यात्रा रद्द झाल्याने हे बुकिंग देखील रद्द होणार आहेत. परिणामी व्यवसायाला याचा पुन्हा एकदा फटका बसणार आहे. यामध्ये शासकीय तसंच खाजगी हॉटेल्सचे बुकिंग प्रभावित होणार आहे. जानेवारीमध्ये कोरोनाची परिस्थिती सुधारू लागल्यानंतर अनेकांनी बुकिंग केलं होतं, मात्र एप्रिलमध्ये अनेकांनी बुकिंग रद्द केलं आहे. (हे वाचा- Corona रुग्ण दगावल्याने नातेवाईकांची तोडफोड, दुसऱ्यांदा या हॉस्पिटलवर हल्ला ) 2020 मध्ये चार धाम यात्रा जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झाली होती. तरी गेल्यावर्षी 3 लाख 10 हजार भाविकांनी दर्शन घेतलं होतं. तर 2019 मध्ये जेव्हा यात्रेवर कोणतीही बंदी नव्हती त्यावेळी रेकॉर्ड 32 लाख भाविक दर्शनासाठी याठिकाणी पोहोचले होते. कोरोनाच्या वाढत्या घटनांंमुळे यंदा कुंभमेळा लवकर संपवण्यात आला. तरी देखील या कालावधीमध्ये कुंभमेळ्यासाठी झालेल्या गर्दीमुळे कोरोनाची आकडेवारी वाढल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.