JOIN US
मराठी बातम्या / करिअर / सुवर्णसंधी! राज्याच्या जलसंपदा विभागात 'या' पदांसाठी जागा रिक्त; रिटायर्ड अधिकाऱ्यांना मिळेल संधी

सुवर्णसंधी! राज्याच्या जलसंपदा विभागात 'या' पदांसाठी जागा रिक्त; रिटायर्ड अधिकाऱ्यांना मिळेल संधी

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2022 असणार आहे.

जाहिरात

जलसंपदा विभाग महाराष्ट्र

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 मे: जलसंपदा विभाग महाराष्ट्र (Water Resource Department Maharashtra Jalsampada Vibhag Maharashtra) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (WRD Maharashtra Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. गुण नियंत्रण अभियंता या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती गुण नियंत्रण अभियंता (Quality Control Engineer) - एकूण जागा 11 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव गुण नियंत्रण अभियंता (Quality Control Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये इंजीनिअरिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवार हे रिटायर्ड इंजिनिअर किंवा डेप्युटी इंजिनिअर असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी या संबंधीची सर्व कागदपत्रं जोडणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरती संदर्भातील सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. UPSC मुलाखतीचे ‘हे’ प्रश्न बुद्धीक्षमतेची घेतील चाचणी; तुम्हाला येतात का उत्तरं? इतर काही पात्रतेचे निकष उमेदवार हे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित सेवेसाठी त्यांच्याकडे क्षमता असणं आवश्यक आहे. उमेदवारांवर कोणत्याही प्रकारची चौकशी प्रलंबित अथवा सुरू नसावी. उमेदवाराचं वय हे 65 वर्षांपेक्षा अधिक नसावं. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता अधीक्षक अभियंता, गुण नियंत्रण मंडळ नागपूर, वैनगंगानगर अजनी नागपूर – 440003. NEET PG 2022: उमेदवारांनो परीक्षेची तारीख आली जवळ; असं करा Admit Card डाउनलोड अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 25 मे 2022

JOB TITLEWRD Maharashtra Recruitment 2022
या पदांसाठी भरतीगुण नियंत्रण अभियंता (Quality Control Engineer) - एकूण जागा 11
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवगुण नियंत्रण अभियंता (Quality Control Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये इंजीनिअरिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवार हे रिटायर्ड इंजिनिअर किंवा डेप्युटी इंजिनिअर असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी या संबंधीची सर्व कागदपत्रं जोडणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरती संदर्भातील सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतर काही पात्रतेचे निकषउमेदवार हे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित सेवेसाठी त्यांच्याकडे क्षमता असणं आवश्यक आहे. उमेदवारांवर कोणत्याही प्रकारची चौकशी प्रलंबित अथवा सुरू नसावी. उमेदवाराचं वय हे 65 वर्षांपेक्षा अधिक नसावं.
अर्ज करण्यासाठीचा पत्ताअधीक्षक अभियंता, गुण नियंत्रण मंडळ नागपूर, वैनगंगानगर अजनी नागपूर – 440003.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://wrd.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या