JOIN US
मराठी बातम्या / करिअर / कोरोना असो वा नसो 'ही' कंपनी देणार आयुष्यभर वर्क फ्रॉम होम करण्याची संधी; तुम्हीही करा अप्लाय

कोरोना असो वा नसो 'ही' कंपनी देणार आयुष्यभर वर्क फ्रॉम होम करण्याची संधी; तुम्हीही करा अप्लाय

बहुतांश कर्मचारी वर्क फ्रॉम होम मागत आहेत. म्हणूनच जगातील या कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना लाईफ टाइम वर्क फ्रॉम होम देण्याची घोषणा केली आहे.

जाहिरात

आयुष्यभर वर्क फ्रॉम होम

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 ऑक्टोबर: कोरोनाच्या काळात घरून काम करण्याची संस्कृती प्रचंड वाढली आहे. लोक त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगत आहेत. मात्र, कोरोना विषाणूचे प्रमाण कमी असल्याने अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवत आहेत. काही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम हवंय तर काही कर्मचारी ऑफिसमध्ये जाण्यास तयारी नाहीत. ज्या कंपन्यांनी वर्क फ्रॉम ऑफिस सुरु केलं आहे अशा कंपन्यांमधून कर्मचारी सोडून जाण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. बहुतांश कर्मचारी वर्क फ्रॉम होम मागत आहेत. म्हणूनच जगातील या कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना लाईफ टाइम वर्क फ्रॉम होम देण्याची घोषणा केली आहे. Career Tips: नक्की किती असते एका एअर होस्टेसची सॅलरी? असे असतात पात्रतेचे कठोर निकष एक कंपनी आहे ज्यानं आपल्या कर्मचार्‍यांना सांगितलं आहे की तुम्ही घरून काम करू शकता. ही प्रणाली जगभरातील 170 देशांतील लोकांसाठी आहे, ज्यामध्ये भारताचा समावेश आहे. या कंपनीचं नाव Airbnb Inc आहे. ही एक अमेरिकन कंपनी आहे, जी लॉजिंग, होमस्टे आणि पर्यटन क्षेत्रात काम करते. 1-2 नाही तर तब्बल 203 जागांसाठी बंपर भरती; ‘महावितरण’मध्ये ‘या’ जागांसाठी करा अप्लाय या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं आहे की, तुम्ही कोणत्याही देशात काम करू शकता. आपण इच्छित असल्यास, आपण कोणत्याही देशातील स्वस्त शहरात राहू शकता. यासाठी पगारात कोणतीही कपात केली जाणार नाही. एअरबीएनबी इंकचे सीईओ आणि सहसंस्थापक ब्रायन चेस्की यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये कंपनीच्या या नवीन धोरणाबद्दल सांगितलं आहे. ते म्हणतात की यामुळे कंपनीला प्रतिभावान लोकांना कामावर ठेवण्याची आणि टिकवून ठेवण्याची संधी मिळेल. मोठी बातमी! भारतीय वायुसेनेत अग्निविरांची भरती जाहीर; ‘या’ तारखेपासून सुरु होणार रजिस्ट्रेशन Airbnb Inc मध्ये सुमारे 6 हजार कर्मचारी आहेत. 3 हजार कर्मचारी अमेरिकेतील आहेत आणि उर्वरित इतर देशांतील आहेत. कंपनीच्या नफ्याबद्दल बोलायचे तर 2021 मध्ये 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीच्या या घोषणेने अनेक कर्मचारी खूश आहेत. सोशल मीडियावर या कंपनीची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे तुम्हालाही लाईफ टाइम वर्क फ्रॉम होम हवं असेल तर या कंपनीमध्ये जॉब करण्यासाठी काहीच हरकत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या