JOIN US
मराठी बातम्या / करिअर / भारतात महिलांनी बाजी मारली, उद्योजकतेत पुरुषांच्या तुलनेत चांगली वाढ

भारतात महिलांनी बाजी मारली, उद्योजकतेत पुरुषांच्या तुलनेत चांगली वाढ

सर्वच क्षेत्रांत प्रगती करणाऱ्या महिलांनी आता उद्योजकतेमध्येही प्रगती करायला सुरुवात केली आहे. पुरुषांच्या तुलनेत उद्योजकतेच्या संधी शोधण्याचं प्रमाण महिलांमध्ये वाढलं आहे, असं ‘लिंक्डइन’ने म्हटलं आहे.

जाहिरात

प्रातिनिधिक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 जुलै : भारतातल्या कंपन्यांमध्ये नेतृत्व करणाऱ्या महिलांचं (Women In Enterpreneurship) प्रमाण कमी म्हणजेच सुमारे 18 टक्के आहे; मात्र सर्वच क्षेत्रांत प्रगती करणाऱ्या महिलांनी आता उद्योजकतेमध्येही प्रगती करायला सुरुवात केली आहे. पुरुषांच्या तुलनेत उद्योजकतेच्या संधी शोधण्याचं प्रमाण महिलांमध्ये वाढलं आहे, असं ‘लिंक्डइन’ने म्हटलं आहे. (WEF) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 2022च्या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टमध्ये याबद्दलची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार, 2016 ते 2021 या कालावधीत नवीन उद्योग सुरू करणाऱ्या महिलांची संख्या 2.68 पट वाढली. त्याच कालावधीत नवउद्योजक पुरुषांची संख्या 1.79 पट वाढली. तसंच, महिला उद्योजकांमध्ये वाढ होण्याचा सर्वाधिक दर 2020-21मध्ये अर्थात कोरोना महामारीच्या काळात होता, असंही आढळून आलं आहे. ‘इंडिया टीव्ही न्यूज’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. उच्च पदावर महिला असण्याचं प्रमाण कमी आहे. तसंच, अंतर्गत रचनेतून महिलांना कंपन्यांमध्ये उच्च पद दिलं जाण्याचं प्रमाणही कमी आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांना उच्च पद दिलं जाण्याची शक्यता 42 टक्के अधिक असते. त्यामुळेच कॉर्पोरेट रचनेत (Corporate Companies) सीनिऑरिटीच्या काळात महिलांना उच्च पदांच्या (Leadership Roles) शिड्या लवकर चढता येत नाहीत. लिंक्डइनच्या (LinkedIn) इंडिया टॅलेंट अँड लर्निंग सोल्युशन्स विभागाच्या वरिष्ठ संचालक रुची आनंद यांनी याविषयी अधिक माहिती दिली. ‘भारतात वर्किंग वूमन्सना कामाच्या ठिकाणी मागे ठेवलं जाण्याचं प्रमाण पुरुषांच्या तुलनेत जास्त आहे; पण या प्रतिकूल परिस्थितीतही अनेक महिलांनी धीर न सोडता स्वतःच्या मर्जीने काम करता येण्यासारखी उद्योजकतेची वाट चोखाळली आहे, असं आमच्या आकडेवारीवरून दिसून येतं. खासकरून 2020-21 या काळात महिलांनी स्वतःचे उद्योग सुरू केले. त्यामुळे स्वतःसोबत अन्य महिलांनाही रोजगाराची संधी उपलब्ध झाली,’ असं रुची यांनी सांगितलं. ( युरिनशी संबंधित ‘या’ समस्या जाणवत असतील तर ओटीपोटाकडे लक्ष देणं गरजेचं ) दरम्यान, महिलांना लीडरशिप रोल्स देण्याच्या बाबतीत 2015च्या तुलनेत आता 1.36 पट वाढ झाली असून, या वर्षी ते प्रमाण 24 टक्क्यांवर गेलं आहे. तरीही यात आणखी वाढ होण्याची आवश्यकता आहे. महिला उद्योजकांना, तसंच महिला कर्मचाऱ्यांना साह्य करण्यासाठी लिंक्डइनने आपले काही कोर्सेस ऑगस्ट 2022पर्यंत मोफत ठेवले आहेत. त्यात फंडिंग कसं मिळवावं, महिलांनी नेतृत्वासाठी धोरणं कशी ठरवावीत, कामाच्या ठिकाणी यश कसं मिळवावं आदी कोर्सेसचा त्यात समावेश आहे. ‘कंपन्यांनी महिलांना संधी देण्यासाठी निवड करताना कौशल्यांवर, लवचिकतेवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. संतुलित प्रतिनिधित्व, दृष्टिकोनांची विविधता आणि सर्वसमावेशक नेतृत्व यातून कंपन्यांची कार्यक्षमता वाढू शकते,’ असंही रुची आनंद यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या