JOIN US
मराठी बातम्या / करिअर / स्वीगीची Moonlighting Policy म्हणजे नक्की आहे काय? ज्यावर भडकले Wiproचे बॉस; थेट म्हणाले 'चीटिंग'

स्वीगीची Moonlighting Policy म्हणजे नक्की आहे काय? ज्यावर भडकले Wiproचे बॉस; थेट म्हणाले 'चीटिंग'

Swiggy नं आपल्या कर्मचाऱ्यांना Moonlighting Policy मंजूर केली आहे. पण ही पोलिसी नेमकी आहे तरी काय? (What is Swiggy Moonlighting Policy?) हे जाणून घेऊया.

जाहिरात

स्वीगीची Moonlighting Policy म्हणजे नक्की आहे तरी काय?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 ऑगस्ट: आजकल कोणत्याही कंपनीत काम करताना तिथल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना त्यांचा महिन्याचा पगार पुरेसा वाटत नाही. तसंच काही कर्मचाऱ्यांना घरातील छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी एक्सट्रा इनकमची गरज असते. त्यामुळे काही कर्मचारी एका कंपनीत काम करतानाही पार्ट टाइम जॉब करायचा प्रयत्न करत असतात. जवळपास देशातील सर्वच कंपन्यांमध्ये असं करणं कंपनीच्या नियमांबाहेर आहे. पण आता याला चॅलेंज करत Swiggy नं आपल्या कर्मचाऱ्यांना Moonlighting Policy मंजूर केली आहे. पण ही पोलिसी नेमकी आहे तरी काय? (What is Swiggy Moonlighting Policy?) हे जाणून घेऊया. स्विगीने अलीकडेच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मूनलाइटिंग पॉलिसी जाहीर केली. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर Swiggy च्या पॉलिसीनुसार swiggy मध्ये काम करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला बाहेर दुसरीकडे दुसऱ्या कंपनीत काम करण्याचीही मुभा असेल. आपल्या कंपनीचं काम झालं कि हे कर्मचारी इतर कुठेही जॉब करू शकतील. मात्र स्वीगीची हे पॉलिसी इतर कंपन्यांना फारशी आवडलेली दिसत नाही. 12वी झालंय? टायपिंगही येतं? मग जॉबचा गोल्डन चान्स सोडू नका; इथे करा अर्ज

Wipro कंपनीचे अध्यक्ष ऋषद प्रेमजी या धोरणाच्या पूर्णपणे विरोधात आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार हे चीटिंग आहे. अशा प्रकारची पॉलिसी म्हणजे कंपन्यांची शुद्ध फसवणूक असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे.

मूनलाइटिंग पॉलिसी मुळात कर्मचार्‍यांना त्यांच्या प्राथमिक कामाव्यतिरिक्त दुसरी नोकरी करण्याची परवानगी देते. विशेष म्हणजे, भारतातील बहुतांश कंपन्या कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीत जॉब असताना दुसऱ्या कोणत्याच कंपनीत जॉब करण्याची परवानगी देत नाही. आणि असा झालंच तर भारतात कार्यरत असलेल्या बहुतेक कंपन्या त्यांच्या कामाच्या वेळेनंतरही गिग्स घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करतात. मात्र स्वीगीने एक वेगळीच पोलीस आणल्यामुळे गोंधळ झाला आहे. WFH संपलं पण ऑफिसमध्ये जाण्याची अजिबात इच्छा नाही? टेन्शन नको; ‘या’ क्षेत्रांमध्ये घरूनच करता येईल काम एकूणच काय तर स्वीगीच्या या वेगळ्याच पॉलिसीला अनेक कंपन्यांकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे विरोध दर्शवला जातो आहे. कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय फायद्याचा असला तरी कंपन्यांची मात्र यामध्ये तारांबळ उडणार आहे. तसंच एच कर्मचारी दोन कंपन्यांमध्ये असला तर प्रायोरिटी कोणत्या कंपनीला द्यावी यामध्येही संभ्रम असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या