या टॉप प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस येणं आवश्यक
मुंबई, 05 फेब्रुवारी: तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दररोज नवे शोध लागत आहेत. माणसाचं काम सोपं आणि वेगात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल यावर सतत अभ्यास सुरू आहे. रोबोटिक्स हे त्यातलं अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. रोबोचा वापर करून कामातलं सातत्य जपण्याचा, जटिल कामात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑटोमोबाईल उद्योगात याचा खूप मोठा उपयोग होतो. त्या शिवायही अनेक क्षेत्रांमध्ये आता त्याचा वापर केला जातोय. त्यामुळेच रोबोटिक्स तंत्रज्ञानाला सध्या वाढती मागणी आहे. हे तंत्रज्ञान बहुतांशी प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसवर अवलंबून असतं. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला रोबोटिक्स तंत्रज्ञानात करिअर करायचं असेल, तर प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस शिकाव्याच लागतात. अशा 5 प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसबाबत माहिती देणारं वृत्त ‘कंटेंट डॉट टेकगिग’नं दिलं आहे. Java कम्प्युटर डेव्हलपर्समध्ये ‘जावा’ ही लोकप्रिय प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. रोबोटिक्सचीसुद्धा ही खूप आवडती लँग्वेज आहे. डेव्हलपर्सना या लँग्वेजमध्ये पोर्टेबिलिटी आणि स्वातंत्र्य मिळतं. ही लँग्वेज बहुतेकवेळा जावा व्हर्च्युअल मशीन्समध्ये वापरली जाते. त्यामुळेच वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर ती रन होऊ शकते. अँड्रॉईड अॅप्लिकेशन तयार करण्यासाठीही या प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा वापर केला जातो. त्यामुळेच रोबोटिक्स प्रकल्प तयार करण्यासाठीही ही लँग्वेज अधिक वापरली जाते. लाल-पिवळा नाही तर Job Interview ला जाताना या 4 रंगांचे कपडे घाला; मग बघा चमत्कार; नोकरी तुमचीच C++ पायथॉन आणि जावा या लँग्वेजेसप्रमाणेच C++ हीसुद्धा एक लोकप्रिय प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. जटिल अल्गोरिदम्स हाताळणं, हाय परफॉर्मन्स आणि लो लेव्हल ऑपरेशन्स यामुळे रोबोटिक्ससाठी C++ ही लँग्वेज खूप लोकप्रिय आहे. Python जावा या लँग्वेजखालोखाल पायथॉन या प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा क्रमांक लागतो. रोबोटिक्स डेव्हलपर्समध्ये हीसुद्धा एक लोकप्रिय लँग्वेज आहे कारण या लँग्वेजमुळे सहजता, साधेपणा, रिडेबिलिटी आणि व्हर्सटॅलिटी मिळते. ही लँग्वेज मशीन लर्निंग, कम्प्युटर व्हिजन आणि कंट्रोल सिस्टिम्स अशा विविध गोष्टींत वापरता येते. त्याशिवाय त्यात रोबोटिक्स तयार करण्याकरता अनेक ओपन सोर्स लायब्ररीज व फ्रेमवर्क उपलब्ध असतात. Introduce Yourself.. नक्की का विचारण्यात येतो हा प्रश्न? असं उत्तर द्याल तर तुम्हालाच मिळेल नोकरी Lua ही लाईटवेट असूनही हाय परफॉर्मिंग लँग्वेज आहे. त्यामुळे रोबोटिक्सच्या क्षेत्रात खूपच जास्त लोकप्रिय आहे. साध्या आणि शिकण्यासाठी अतिशय सोप्या असणाऱ्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजपैकी ही एक लँग्वेज आहे. या लँग्वेजेस छोट्या छोट्या रोबोटिक्स अॅप्लिकेशन्ससाठी व काही प्रकल्पांसाठी उत्तम असतात.
MATLAB MATLAB मध्ये मिळणारी न्युमरिकल कम्प्युटिंग एनव्हायर्नमेंट प्रोग्रॅमिंग लँग्वेज हीदेखील रोबोटिक्समधली आणखी एक लोकप्रिय भाषा आहे. ती रिसर्च व डेव्हलपमेंट, मॉडेलिंग आणि रोबोटिक्स सिस्टिमच्या सिम्युलेशनसाठी वापरली जाते. ही लँग्वेज खूप जणांकडून वापरली जाते. यातही अनेक टूलबॉक्सेस आणि लायब्ररीज आहेत. Competitive Exams: MPSC असो वा NEET कोणतीही स्पर्धा परीक्षा एका झटक्यात होईल क्रॅक; अशी करा स्मार्ट स्टडी कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग यांचा वापर करून रोबोटिक्सचं तंत्रज्ञान विकसित होतं. सध्या त्याला भरपूर मागणी आहे. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यानं या 5 प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसची माहिती घेतली पाहिजे.