सोलापुरातील टॉप शाळा
सोलापूर, 12 एप्रिल: मार्च आणि एप्रिल महिना असल्यामुळे सध्या सर्व शाळांमध्ये आणि विद्यार्थ्यांचा घरात परीक्षेचे (School exams) वारे वाहू लागले आहेत परीक्षा उत्तीर्ण होऊन आपल्या पाल्यांनी चांगल्या शाळेमध्ये प्रवेश (Admissions in best schools) घ्यावा किंवा चांगल्या शाळेत असतील तर पाल्यांनी उत्त्तरोत्तर प्रगती करावी अशी इच्छा प्रत्येक पालकांची असते. त्यात आता परिक्षानंतर पहिली आणि पाचवीच्या प्रवेशांचं (School admissions 2022) सत्र सुरु होणार आहे. आपल्या पाल्यांना चांगल्या शाळेत (Best schools in Maharashtra) प्रवेश मिळावा पालकांमध्ये अक्षरशः शर्यत लागली असते. RTE च्या अंतर्गत प्रवेश (How to get RTE Admissions) मिळवण्यासाठी कित्येक पालक तासंतास शाळांसमोर रांगेत उभे असतात. पण आपल्या मुलांनी चांगल्या शाळेत शिक्षण घ्यावं अशी तुमचीही इच्छा असेल आणि तुम्ही चांगल्या शाळांच्या शोधात (How to get Admission in best school) असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला सोलापूर शहरातील टॉप 5 CBSE शाळा (Top 5 CBSE schools in Solapur List) आणि या शाळांबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत. ज्यामुळे तुमच्या पाल्यांना उत्तम शिक्षण घेण्यास (Best educational schools in Solapur) मदत होईल. चला तर जाणून घेऊया संपूर्ण लिस्ट (List of best CBSE schools in Solapur). 1. इंडियन मॉडेल स्कुल इंडियन मॉडेल स्कुल या शाळेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणितासाठी विशेष प्रयोगशाळा., इंग्रजी भाषा प्रयोगशाळा., अत्याधुनिक संगणकांसह संगणक प्रयोगशाळा. आहेत. तसंच विद्यार्थ्यांना क्रिकेट खेळपट्टी या सुविधाही देण्यात आल्या आहेत. या शाळेत विद्यार्थ्यांनो स्टेट बोर्ड अंतर्गत शिक्षण देण्यात येतं. सोलापुरातरील काही नांकित शाळांपैकी ही एक शाळा आहे.
इंडियन मॉडेल स्कुल
इंडियन मॉडेल स्कुल | माहिती |
---|---|
शाळेचा पत्ता | Jule Solapur, Solapur, Maharashtra 413004, India |
शाळेचा फोन क्रमांक | (0217) 2342337 |
शाळेचा ई-मेल आयडी | info@imschools.com |
वेबसाईट | http://www.imsschools.com/imsstate/ |
2. जवाहर नवोदय विद्यालय जवाहर नवोदय विद्यालय ही शाळा केम्द्रा सरकारच्या अंतर्गत येते. सरकारी शाळा असल्यामुळे इथे विद्यार्थ्यांना सर्व सुविधा पुरवण्यात येतात. तसंच या शाळेत विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोयही केली जाते. ही शाळा सरकारी असली तर CBSE बोर्डाचं शिक्षण देण्यात येतं. इथे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण देण्यात येतं. विद्यार्थ्यांना इथे स्पोर्ट्स, संगीत या विषयांचं शिक्षणही देण्यात येतं.
जवाहर नवोदय विद्यालय
जवाहर नवोदय विद्यालय | माहिती |
---|---|
शाळेचा पत्ता | Pokharapur, Tehsil- Mohol, Solapur, Maharashtra 413248, India |
शाळेचा फोन क्रमांक | (02189) 232538 / 9822534049 |
शाळेचा ई-मेल आयडी | jnvsholapur_1986@rediffmail.com |
वेबसाईट | https://www.navodaya.gov.in/nvs/nvs-school/Solapur/en/home/ |
3. शंकरराव मोहिते- पाटील इंग्लिश स्कूल या शाळेची स्थापना 1979 साली करण्यात आली आहे. ही शाळा Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education म्हणजे स्टेट बोर्डाची आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच इतर महत्त्वाच्या गोष्टीही शिकवण्यात येतात. तसंच विद्यार्थ्यांना इथे स्पोर्ट्सचंही शिक्षण देण्यात येतं. स्टेट बोर्डाच्या नामांकित शाळांपैकी एक ही शाळा आहे.
शंकरराव मोहिते- पाटील इंग्लिश स्कूल
शंकरराव मोहिते- पाटील इंग्लिश स्कूल | माहिती |
---|---|
शाळेचा पत्ता | Shankarnagar-Akluj, Tal: Malshiras, Solapur, Maharashtra 413118, India |
शाळेचा फोन क्रमांक | (02185) 222552, 227065 |
शाळेचा ई-मेल आयडी | smpes_akluj@yahoo.com |
वेबसाईट | http://smpeschool.com |
4. श्री. स्वामीनारायण गुरुकुल ही शाळा सोलापुरातील CBSE शाळा आहे. अभ्यासक्रम हा डिजिटल सपोर्टसह विद्यार्थी-केंद्रित शिक्षणाचा अनोखा मिलाफ आहे. हे प्रायोगिक-आधारित शिक्षणाचे अनुसरण करते जे संकल्पना स्पष्टता एकत्रित करते आणि विस्तारित शिक्षण आणि संज्ञानात्मक विकासासाठी संधी प्रदान करते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही शाळा उत्तम आहे.
श्री. स्वामीनारायण गुरुकुल
श्री. स्वामीनारायण गुरुकुल | माहिती |
---|---|
शाळेचा पत्ता | Sy. No. 211/1a, Akkalkot Road, Harini Nagar, Po. Kumbhari T&D, Solapur, Maharashtra 413006, India |
शाळेचा फोन क्रमांक | 8087006555, 8605651222 |
शाळेचा ई-मेल आयडी | solapur@gurukul.org |
वेबसाईट | https://gurukul.org/solapur/ |
5. पोदार इंटरनॅशनल स्कूल पोदार हे आज एक विश्वासार्ह नाव आहे आणि भारतातील सर्वोच्च शाळांच्या विस्तृत नेटवर्कद्वारे आपल्या मुलांचे आणि राष्ट्राचे भविष्य घडवण्याच्या सामूहिक प्रयत्नात एक मान्यताप्राप्त नाव आहे. पोदार स्कुल हे देशभरात सर्वत्र आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणासह इतर सोयो सुविधाही प्रदान केल्या जातात. तसंच विद्याथ्यांना स्पोर्ट्समध्ये अग्रेसर बनवण्यात येतं.
पोदार इंटरनॅशनल स्कूल
पोदार इंटरनॅशनल स्कूल | माहिती |
---|---|
शाळेचा पत्ता | Survey No. 19-6, Om Garden, Adjacent to Rajaswa Nagar, Vijapur Road, Solapur, Maharashtra 413004, India |
शाळेचा फोन क्रमांक | (0217) 2300116, 2300118 / 7506280418 |
शाळेचा ई-मेल आयडी | admin.solapur@podar.org |
वेबसाईट | https://www.podareducation.org/school/solapur/gcontactus673 |
महत्त्वाची सूचना - शिक्षण घेण्यासाठी कुठलीही शाळा कमी नाही. वरील सर्व शाळा या टॉप म्हणून आमच्यातर्फे निवडण्यात आलेल्या नाहीत. सदर शाळांची प्रसिद्धी आणि त्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता या शाळांची लिस्ट देण्यात आली आहे.