JOIN US
मराठी बातम्या / करिअर / यशस्वी करिअर घडवण्यासाठी जाणून घ्या ‘या’ गोष्टी, जीवनात नेहमीच उपयोगी पडतील

यशस्वी करिअर घडवण्यासाठी जाणून घ्या ‘या’ गोष्टी, जीवनात नेहमीच उपयोगी पडतील

प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी लोकं असतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Career Building : सध्याच्या काळात स्पर्धा अतिशय वाढली आहे. एखाद्या क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठीही स्पर्धा असते तसंच नोकरी मिळवण्यासाठीही स्पर्धा करावी लागते. स्वतःला अधिकाधिक सक्षम करण्यासाठीची अनेक साधनं आता उपलब्ध आहेत. त्यामुळेही स्पर्धा वाढली आहे. अशा वेळी करिअर घडवण्यासाठी केवळ शिक्षणावर अवलंबून राहता येणार नाही. उत्तम करिअर घडवण्यासाठी चांगलं मार्गदर्शनही मिळायला हवं. तसंच स्वतःमध्ये काही बदलही केले पाहिजेत. उत्तम करिअरचे अनेक फायदे असतात. चांगल्या करिअरमुळे आयुष्य सुरक्षित होतं, नव्या संधी मिळतात. मात्र त्यासाठी स्वतःच्या काही सवयी बदलल्या पाहिजेत व अनेकविध पर्यायांचा विचार केला पाहिजे. करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी जाणून घ्या 11 मार्गदर्शक गोष्टी. शैक्षणिक पात्रता - करिअरसाठी कोणतंही क्षेत्र निवडताना तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार निवडा. त्यामुळे त्यातील संधींचा लाभ घेता येईल. ध्येयनिश्चिती - प्रयत्न करताना डोळ्यांसमोर एक निश्चित ध्येय ठेवा. त्यामुळे तुमच्या प्रयत्नांना दिशा मिळेल, अन्यथा निराशाच पदरी पडेल. स्वतःची बलस्थानं ओळखा - स्वतःची बलस्थानं ओळखा व उणिवा जाणून घ्या. त्या उणिवा दूर करण्यासाठी प्रयत्न करा. स्वतःच्या बलस्थानांचा उपयोग करिअरसाठी करून घेता येईल. जबाबदारी घ्या - स्वतःच्या करिअरची, आयुष्याची जबाबदारी घेऊन तसे प्रयत्न करा. जबाबदारीची जाणीव प्रयत्नांना सातत्याची जोड देते. एका गोष्टीवर लक्ष केंद्रीत करा - कोणत्याही एका क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करा. यामुळे त्या क्षेत्रातील तुमचं नैपुण्य वाढेल व यशस्वी होण्याचा मार्ग सापडेल. स्वतःला उत्तरमरित्या सादर करा - स्वतःकडे केवळ ज्ञान असून चालत नाही, तर ते मांडताही आलं पाहिजे. स्वतःला जगासमोर चांगलं सादर करता यायला पाहिजे. त्या दृष्टीने स्वतःमध्ये बदल घडवले पाहिजेत. नव्या जबाबदारीसाठी स्वतःला तयार करा - करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतात. त्यामुळे तुमची कुशलता सिद्ध होते. जनसंपर्क वाढवा - जनसंपर्क अधिक असला, तर संधींची उपलब्धता अधिक राहते. करिअर घडवण्यासाठी ही गोष्टही आवश्यक असते. मेहनती करताना मागे-पुढे पाहू नका - कोणत्याही क्षेत्रात गेलात, तरी मेहनत करावीच लागते. त्याशिवाय यश मिळत नाही. त्यामुळे मेहनतीची तयारी ठेवा. हेही वाचा -  प्रेरणादायी! सलून चालकाच्या पोरीची कमाल, MPSC परीक्षा पास करत बनली RTO इन्स्पेक्टर नेहमी यशस्वी व्यक्तींसोबत राहा - यशस्वी व्यक्तींच्या सहवासात राहिल्यानं आपण सकारात्मक वातावरणात राहतो. या उर्जेमुळे स्वतःमध्ये चांगले बदल घडून येतात. स्वतःमध्ये सुधारणा करा - कोणतीही व्यक्ती अचूक किंवा उत्कृष्ट नसते. मात्र उत्तम होण्यासाठी स्वतःच्या चुका सुधारणं शक्य असतं. त्यामुळे कमीतकमी चुका होऊन जास्तीतजास्त उत्तम काम आपण करू शकतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी लोकं असतात. मात्र, त्यांचा हा प्रवास एका रात्रीत घडत नाही. त्यासाठी उत्तम शिक्षणाबरोबरच प्रयत्न, सातत्य आणि मेहनत करावी लागते. स्वतःला सतत सुधारावं लागतं. यामुळेच परिपूर्णतेकडे जाता येतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या