जयपूर, 12 जुलै: सर्वात कमी वयात जज होण्याचा मान राजस्थानमधील एका तरुणानं मिळवला आहे. कमी वयात पहिल्याच प्रयत्नात जज होऊन या तरुणानं इतिहास रचला आहे. मयंक प्रताण सिंग यांनी कसं हे यश खेचून आणलं हे जाणून घेणार आहोत. राजस्थान ज्युडिशियल सर्व्हिसेस (आरजेएस) परीक्षेत अव्वल राहून 21 वर्षीय मयंक यांनी इतिहास रचला आहे. सर्वात कमी वयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्त होत आहे. 2019 मध्ये लागलेल्या निकालात त्यांनी पहिल्याच प्रयत्नात अव्वल यश मिळवले. हे वाचा- एका हाताला सलाइन आणि दुसऱ्या हातात पुस्तक, नवजीवन यांच्या संघर्षाची यशोगाथा न्यायाधीशाची परीक्षा देण्याचं मयंक यांनी मनाशी पक्क केलं होतं. त्यासाठी कोचिंग क्लास न लावता स्वअध्यक्ष केलं. साधारण दिवसातील 7 ते 8 तास एकग्र होऊन अभ्यासाला दिले. यामध्ये जेवढं करीनं तेवढं परफेक्ट असायला हवं हे मनाशी पक्क होतं. कधी कधी 12 ते 14 तासही अभ्यास करायचो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही किती इमानदारीनं आणि मन लावून मेहनत घेऊन अभ्यास करता यावर तुम्ही यश किती वेगानं खेचून आणता हे अवलंबून आहे अशी प्रतिक्रिया मयंक यांनी दिली आहे. मयंक जयपूरमध्ये राहतात, त्याचे आई-वडील सरकारी शाळेत शिक्षक आहेत. मोठी बहिण इंजिनियर आहे. राजस्थान विद्यापीठातून त्यांनी LLBची पदवी घेतली. त्यांनी शिक्षण घेत असतानाच न्यायाधीश होण्याचा निश्चय पक्का केला होता. नव्या नियमानुसार 21 वर्ष पूर्ण झाल्यावर परीक्षा देता येते हे कळताच त्यांना आनंद झाला. मयंक यांनी पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा देऊन अव्वल यश मिळवले आहे.