परीक्षेचा सिलॅबस आणि Exam Pattern
मुंबई, 22 ऑगस्ट: स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) स्टेनोग्राफरच्या पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. स्टेनोग्राफर ग्रेड सी अंतर्गत, केंद्र सरकारच्या मंत्रालये आणि विविध विभागांमधील स्टेनोग्राफरच्या रिक्त जागा भरल्या जातील, तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या रिक्त जागा स्टेनोग्राफर ग्रेड डी द्वारे भरल्या जातील. पात्र आणि इच्छुक उमेदवार ssc.nic.in या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या (SSC Stenographer Recruitment 2022) अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 सप्टेंबर 2022 आहे. तुम्हालाही ही परीक्षा देण्याची इच्छा असेल आणि सरकारी नोकरी हवी असेल तर या परीक्षेबाबतच्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) स्टेनोग्राफरच्या परीक्षेच्या सिलॅबस आणि exam पॅटर्नबद्द सर्व माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. SSC स्टेनोग्राफर “C” आणि “D” परीक्षेत 02 टियर्सचा समावेश करण्यात येणार आहे. टियर-1 मध्ये CBT (संगणक आधारित मोड परीक्षा) असणार आहे तर टियर-2 परीक्षेत शॉर्टहँड कौशल्य स्किल टेस्ट होणार आहे. यामध्ये टियर एकमध्ये General Intelligence & Reasoning, General Awareness, English Language & Comprehension या तीन गोष्टींची टेस्ट होणार आहे. SSC Stenographer Recruitment 2022: 12 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; स्टेनोग्राफर पदांसाठी बंपर भरती General Intelligence & Reasoning या सेक्शनमध्ये विचारण्यात येणाऱ्या टॉपिक्सची लिस्ट खालील प्रमाणे असणार आहे - Classification, Word Formation, Venn Diagram, Matrix, Verbal reasoning, Non-Verbal Reasoning, Blood Relations , Analogy, Coding-Decoding, Paper Folding Method, Series. General Awareness या सेक्शनमध्ये विचारण्यात येणाऱ्या टॉपिक्सची लिस्ट खालील प्रमाणे असणार आहे - Static General Knowledge (Culture, Indian History, etc.), Portfolios, People in News., Important Schemes, Science, Sports, Books and Authors, Current Affairs. टियर 2 मध्ये शॉर्टहँड स्किल्स टेस्ट टियर 2 मध्ये शॉर्टहँड स्किल्स टेस्ट होणार आहे. ज्यांनी टियर एक परीक्षा पास केली त्या उमेदवारांना शॉर्टहँड स्किल्स टेस्टबोलवलं जाणार आहे. उमेदवारांना स्टेनोग्राफी चाचणीसाठी हजर राहावे लागेल. उमेदवारांना 100 w.p.m च्या वेगाने इंग्रजी/हिंदीमध्ये 10 मिनिटांसाठी एक डिक्टेशन दिले जाईल. स्टेनोग्राफर ग्रेड ‘C’ आणि 80 w.p.m. या पदासाठी स्टेनोग्राफर ग्रेड ‘डी’ पदासाठी. प्रकरण गणनेवर लिप्यंतरित करावे लागेल. 10वी उत्तीर्णांना सैन्यात नोकरीची मोठी संधी! ITBP मध्ये ‘या’ पदांसाठी बंपर ओपनिंग्स; अशी होईल निवड असं असेल टियर-1 परीक्षेचं पॅटर्न परीक्षेची पद्धत: ऑनलाइन (संगणक आधारित चाचणी) प्रश्नांचा प्रकार: एकाधिक निवड वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विभागांची संख्या: एकूण 03 विभाग आहेत एकूण गुण: 200 गुण प्रश्नांची संख्या: 200 प्रश्न परीक्षेचा कालावधी: 120 मिनिटे तसंच या परीक्षेत 0.25 मार्कांची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे.