मुंबई, 22 ऑगस्ट: तुम्ही जर 12वी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) स्टेनोग्राफरच्या पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. स्टेनोग्राफर ग्रेड सी अंतर्गत, केंद्र सरकारच्या मंत्रालये आणि विविध विभागांमधील स्टेनोग्राफरच्या रिक्त जागा भरल्या जातील, तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या रिक्त जागा स्टेनोग्राफर ग्रेड डी द्वारे भरल्या जातील. पात्र आणि इच्छुक उमेदवार ssc.nic.in या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या (SSC Stenographer Recruitment 2022) अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 सप्टेंबर 2022 आहे. लक्षात ठेवा की, स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी परीक्षा संगणकावर आधारित असेल. निवड झालेल्या उमेदवारांसाठी कौशल्य चाचणी (Skill Test) घेतली जाईल. ग्रेड सी आणि डी मध्ये उपस्थित असलेल्या उमेदवारांना डिक्टेशन दिलं जाईल, ते ऐकल्यानंतर तुम्हाला ते सर्व शब्द टाइप करावे लागतील. आता आपण अर्जापासून ते निवड प्रक्रियेपर्यंत संपूर्ण माहिती घेणार आहोत. महत्वाच्या तारखा- उमेदवार एसएससी स्टेनोग्राफरच्या पदांसाठी 20 ऑगस्ट 2022 ते 05 सप्टेंबर 2022 या कालावधीत अर्ज करू शकतात. 5 सप्टेंबर नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. प्रवेशपत्र आणि परीक्षेबाबत अद्याप कोणतीही तारीख नमूद केलेली नाही. यासंबंधीची अधिसूचना जारी होताच तुम्हाला सूचित केलं जाईल. शैक्षणिक पात्रता- अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण असावा. तसेच, ज्या उमेदवारांना C ग्रेडसाठी अर्ज करायचा आहे, त्यांचे कमाल वय 30 वर्षे आणि किमान वय 18 वर्षे असावं, तर ग्रेड D साठी 18 ते 17 वर्षे दरम्यानचे उमेदवार अर्ज करू शकतात. मात्र, वयोमर्यादेच्या आधारावर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना येथे सवलत दिली जाईल. हेही वाचा: 10वी उत्तीर्णांना सैन्यात नोकरीची मोठी संधी! ITBP मध्ये ‘या’ पदांसाठी बंपर ओपनिंग्स; अशी होईल निवड एसएससी स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी भर्ती 2022साठी अर्ज कसा करावा?
- सर्व प्रथम SSC च्या अधिकृत वेबसाईट ssc.nic.in ला भेट द्या.
- होमपेजवर, SSC ग्रेड C आणि ग्रेड D स्टेनोग्राफर रिक्रूटमेंट 2022 लिंकवर क्लिक करा.
- येथे स्वतःची नोंदणी करा, नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
- आता अर्ज पूर्णपणे भरा.
- सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा.
- त्यानंतर अर्जाची फी भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
- तुमचा अर्ज स्वीकारला जाईल.
अशी असेल भरती प्रक्रिया- एसएससी स्टेनोग्राफर ग्रुप सी आणि डी परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाईल. पेपर-1 संगणकावर आधारित असेल. येथे 200 गुणांचे एकूण 200 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा असेल, त्यापैकी 50 प्रश्न सामान्य ज्ञान, 50 प्रश्न बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्रातून आणि 100 प्रश्न इंग्रजी भाषेचे असतील. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, हे लक्षात ठेवायलं हवं. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील. त्याचबरोबर लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांची स्किल टेस्ट घेतली जाईल. निवडलेल्या उमेदवारांची थेट सी आणि डी ग्रेडसाठी निवड केली जाईल.