JOIN US
मराठी बातम्या / करिअर / SSC Result 2023: लक्ष द्या! 10वीनंतर फक्त 12वी हाच पर्याय नाही; 'हे' शॉर्ट टर्म कोर्सेस करूनही होऊ शकता मालामाल

SSC Result 2023: लक्ष द्या! 10वीनंतर फक्त 12वी हाच पर्याय नाही; 'हे' शॉर्ट टर्म कोर्सेस करूनही होऊ शकता मालामाल

Maharashtra Ssc Result 2023 Updates In Marathi: तुम्ही दहावी उत्तीर्ण केल्यांनतर काही शॉर्ट टर्म कोर्सेस करून नोकरी करू शकता. अशाच काही कोर्सेस बद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जाहिरात

या शॉर्ट टर्म कोर्सेसला घ्या प्रवेश

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 मे: महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे आता दहावीनंतर नक्की काय करायचं? बारावी करायचं की दुसऱ्या कोणत्या फिल्डला प्रवेश घ्यायचा याचा विचार विद्यार्थी करत असतील. अनेकांना बारावी करायची इच्छा नसेल किंवा आजकाल अनेक विद्यार्थ्यांना पैसे कमवण्याची इच्छा असते. यासाठी त्यांना अधिक वेळ वाटही बघायची नसते. दहावी झाल्यानंतर त्यांना लगेच जॉब हवा असतो. घरची आर्थिक परिस्थिती यामागचं एक प्रमुख कारण असू शकतं. दहावीनंतर हे शक्य आहे. आता तुम्ही दहावी उत्तीर्ण केल्यांनतर काही शॉर्ट टर्म कोर्सेस करून नोकरी करू शकता. अशाच काही कोर्सेस बद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला दहावीनंतर ही चांगला जॉब लागू शकतो. चला तर मग जाणून घेऊया. स्टेनोग्राफी आणि टायपिंग 10वी नंतर तुम्ही स्टेनोग्राफी आणि वेगवेगळ्या भाषांच्या टायपिंगमध्ये डिप्लोमा करू शकता. अशा उमेदवारांसाठी न्यायालये आणि इतर अनेक सरकारी खात्यांमध्ये रिक्त पदे येत राहतात. ज्यांच्यासाठी स्टेनो अनिवार्य आहे. मात्र, या नोकऱ्यांसाठी फास्ट टायपिंगचा वेग खूप महत्त्वाचा आहे.

Maharashtra SSC Result 2023: विद्यार्थ्यांनो, पेढे तयार ठेवा! याच आठवड्यात… 10वी बोर्डाच्या निकालाबाबत समोर आली महत्त्वाची अपडेट ITI दहावीनंतर आयटीआयही करता येते. जर तुम्हाला स्वतःचे काही काम करायचे असेल तर हा कोर्स करून तुम्ही सहज चांगले पैसे कमवू शकता. रेल्वेसह अनेक कारखाने आणि प्लांटमध्ये नोकऱ्यांच्या मोठ्या संधी आहेत. SSC Result 2023: 10वीचा निकाल काहीही येऊ देत; करिअर पुढे न्यायचंय ना? मग ‘हे’ ऑप्शन्स ठरतील बेस्ट हार्डवेअर आणि नेटवर्किंग सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात लोक आता अधिकाधिक लॅपटॉप, संगणक, मोबाईल आणि इतर तंत्रज्ञानावर आधारित उपकरणे वापरत आहेत. यासोबतच हार्डवेअर तज्ज्ञांची मागणीही वाढत आहे. अशा परिस्थितीत संगणक हार्डवेअर आणि नेटवर्किंगमध्ये डिप्लोमा करून चांगली नोकरी मिळवू शकता. तसेच तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. ना पैशांची चणचण, ना घ्यावी लागेल उधारी; 10वी नंतर हे पार्ट टाईम जॉब्स देतील पैसे हॉटेल मॅनेजमेंट दहावी केलेल्या विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात करिअर करण्याची चांगली संधी आहे. दीड वर्षाच्या डिप्लोमा कोर्सनंतर हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात नोकरी मिळू शकते. जर तुम्हाला एकापेक्षा जास्त भाषा आणि परदेशी भाषांचे आकलन आणि ज्ञान असेल तर तुम्हाला ते खूप उपयुक्त आणि फायदेशीर वाटू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या