JOIN US
मराठी बातम्या / करिअर / SSC BOARD EXAM: 15 दिवसांत अभ्यास करून मिळवा 90 टक्के मार्क

SSC BOARD EXAM: 15 दिवसांत अभ्यास करून मिळवा 90 टक्के मार्क

15 दिवसांमध्ये अभ्यास करून चांगले मार्क मिळवण्याचा गुरूमंत्र.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 फेब्रुवारी: दहावीची परीक्षा 3 मार्चपासून सुरू होत आहे. त्यामुळे अजून तसं पाहायला गेलं तर 10 वीच्या विद्यार्थ्यांकडे 15 दिवसांचा अभ्यासासाठी अवधी आहे. या 15 दिवसांमध्ये कठोर मेहनत घेतली तर तुम्ही नक्कीच 85 ते 90 टक्क्यांपर्यंत मार्क मिळवू शकता. इंटरनल परीक्षांमधील मार्क वगळता आता लेखी पेपरमधून आपल्याला उरलेले मार्क भरून काढण्याची ही एकच संधी आहे. त्यामुळे चला तर जाणून घेऊया 15 दिवसांत ही जादू कशी घडणार आहे ते. 1. दिवसात एका विषयाचे दोन धडे पूर्ण करण्याचा निर्धार करा. प्रत्येक शब्द समजून आणि शांतपणे वाचायला हवा. तीन तासांत एका विषयाचे दोन धडे वाचून पूर्ण व्हायला हवेत. 2. त्यानंतर दोन तास फक्त धड्याखालचे आणि इतर प्रश्न सोडवण्यावर भर द्या. उत्तरं लिहिताना ती मुद्द्यांमध्ये लिहिल्यानं लक्षात राहातील आणि लेखनाचा सराव होईल. हेही वाचा- Board Exam 2020 : commerceच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी कशी करावी? 3. विज्ञान, गणित सारख्या विषयांमध्ये सराव महत्त्वाचा आहे. सूत्र लिहून पाहा. विषय ठरवून घ्या. भाषा, सोशल सायन्स, सायन्स आणि गणित या चार पैकी अलटून-पलटून विषय घ्या. 4. एवढं करून तुमच्याकडे वेळ उरला दिवसभरात तर तुम्ही घड्याळ लावून सराव पत्रिका किंवा मागिल वर्षीची प्रश्न पत्रिका सोडवायला हवी.आत्मविश्वास ठेवा. योग्य विश्रांती घ्या. आणि सोप्या शब्दात पण आपल्या भाषेत उत्तर पत्रिकेत लिहा. 5.योग्य तिथे आकृती, ट्री डायग्राम किंवा चार्ट काढावा. यामुळे तुम्हाला उत्तर लिहिताना फायदा होईल. आकृत्यांना पेन्सिलिनं चौकोन करावा. आकृत्यांमध्ये खाडाखोड नसावी. याशिवाय पेपरमध्ये खाडाखोड झाली तर चार वेळा एकाच ठिकाणी न खोडता एक काट मारून पुढे जावं. एकच शब्द दोन ते तीन वेळा गिरवणं टाळावं. हेही वाचा- SSC Board Exam : कमी वेळात संपूर्ण सिलॅबसचा अभ्यास झटपट कसा कराल?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या