पुणे विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू
मुंबई, 15 जून: बारावीचे निकाल जाहीर झाले असून, आता राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठातील (SPPU) अंडरग्रॅज्युएट, डिप्लोमा आणि पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेससाठी आजपासून (बुधवार, 15 जून 22) प्रवेश प्रक्रिया (SPPU Admissions Process) सुरू झाली आहे. यासाठी 15 ते 17 जूनदरम्यान ऑनलाईन अर्ज (SPPU Admission online form) जमा करता येतील. त्यानंतर प्रवेश परीक्षा होईल. प्रवेश परीक्षेची (SPPU entrance exam) तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नसली, तरी पुढील महिन्यात ती पार पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दी इंडियन एक्सप्रेसने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. तीनच दिवसांत करावं लागणार रजिस्ट्रेशन विद्यापीठातील विविध कोर्सेससाठी एकूण 2,500 जागा आहेत. यासाठी सुमारे 30 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज येण्याची शक्यता आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना सर्वांत आधी कॅम्पस कॉमन एंट्रन्स एक्झाम प्लॅटफॉर्म (CCEP) या पोर्टलवर (Pune University admission portal) जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. यासाठी 15 ते 17 जून हा तीनच दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या प्लॅटफॉर्मवर 15 जून दुपारी तीन वाजल्यानंतर प्रवेश अर्ज आणि प्रवेश परीक्षेसंबंधी नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे. “मोदी जी NEET UG परीक्षा पुढे ढकला”; विद्यार्थ्यांची का करताहेत अशी मागणी?
ई-मेलवर मिळणार हॉल तिकीट विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांच्या अर्जांची आधी प्रवेश विभागाकडून छाननी करण्यात येईल. ही छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, प्रवेश परीक्षेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट आणि इतर माहिती ई-मेलवर देण्यात येईल. जुलैमध्ये ही प्रवेश परीक्षा पार पडणार असल्याचा अंदाज आहे. खासगी विद्यापीठांची प्रवेश प्रक्रियाही सुरू दरम्यान, कित्येक खासगी विद्यापीठांनीही आपली प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. एमआयटी-डब्ल्यूपीयू (MIT-WPU), डीवाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी (DY Patil University) यांच्यासह 14 विद्यापीठांचा प्री-एमिनंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन (PERA) नावाचा ग्रुप आहे. या संपूर्ण ग्रुपची संयुक्त प्रवेश परीक्षा घेतली जाते. पेरा-सीईटी (PERA CET application form) असं नाव असणाऱ्या या परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची दुसरी फेरी सध्या सुरू आहे. 26 जून 22 ही अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे.
रिटायर्ड झालात म्हणून काय झालं? मंत्रालयात तुम्हाला मिळेल अधिकारी पदावर जॉब्स
तेव्हा बारावीनंतर जर तुम्हाला चांगल्या विद्यापीठात प्रवेश हवा असेल, तर आता तातडीने ठिकठिकाणी अर्ज दाखल करावे लागणार आहेत. पुणे विद्यापीठाप्रमाणेच इतर विद्यापीठंही लवकरच प्रवेश अर्ज आणि प्रवेश प्रक्रियांबाबत माहिती जाहीर करतील. बहुतांश ठिकाणी प्रवेश अर्ज हे ऑनलाईन घेतले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या विद्यापीठांच्या वेबसाईट्सवर नजर ठेवणं गरजेचं आहे.