JOIN US
मराठी बातम्या / करिअर / मोठी बातमी! RRB Group D परीक्षेचं स्कोरकार्ड जारी; कशी असेल पुढची प्रोसेस? इथे मिळेल संपूर्ण माहिती

मोठी बातमी! RRB Group D परीक्षेचं स्कोरकार्ड जारी; कशी असेल पुढची प्रोसेस? इथे मिळेल संपूर्ण माहिती

उमेदवारांनी नोंद घ्यावी की स्कोअर कार्ड पाहण्याची अंतिम तारीख 1 जानेवारी 2023 आहे. यानंतर अधिकृत वेबसाइटवरून लिंक काढून टाकली जाईल.

जाहिरात

अशी असेल PET

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 डिसेंबर: RRB Group D निकाल जाहीर केल्यानंतर, रेल्वे भर्ती बोर्डाने (RRB) आता स्कोअरकार्ड देखील जारी केले आहे. उमेदवार संबंधित झोनच्या अधिकृत वेबसाइटवरून ग्रुप डी स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात. सर्व उमेदवार 1 जानेवारी 2023 पर्यंत त्यांचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख टाकून RRB च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या लिंकद्वारे त्यांचे सामान्यीकृत गुण आणि शॉर्ट-लिस्टिंग स्थिती तपासू शकतात. उमेदवारांनी नोंद घ्यावी की स्कोअर कार्ड पाहण्याची अंतिम तारीख 1 जानेवारी 2023 आहे. यानंतर अधिकृत वेबसाइटवरून लिंक काढून टाकली जाईल. कशी असेल पुढची प्रोसेस? याबद्दलची माहिती जाणून घेऊया. आरआरबी ग्रुप डी परीक्षा 17 ऑगस्ट ते 11 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात आली. ही परीक्षा अनेक टप्प्यांत घेण्यात आली. तर, आता सीबीटी टप्प्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांना पीईटी फेरीसाठी हजर राहावे लागेल. ही पीईटी फेरी जानेवारीमध्ये घेतली जाईल. शिवाय, अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. भारतातील ग्रॅज्युएट्सना लागणार जॉबची बंपर लॉटरी; Google आणि Wipro करणार मोठी भरती; करा अप्लाय असं डाऊनलोडकर तुमचं स्कोरकार्ड RRB ग्रुप डी स्कोअरकार्ड उमेदवार डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम संबंधित झोनच्या RRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर आता आरआरबी ग्रुप डी स्कोअरकार्ड लिंकवर क्लिक करा. एक नवीन लॉगिन पृष्ठ उघडेल. तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाका. स्कोअरकार्ड ऍक्सेस करा आणि ते डाउनलोड करा. भविष्यातील संदर्भांसाठी प्रिंटआउट घ्या Maharashtra Police Bharti: शारीरिक चाचणीला जाताना Admit Cards न्यायला विसरू नका; असे करा डाउनलोड RRB ग्रुप D CBT परीक्षेनंतर पुढे काय? शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) RRB ग्रुप डी (लेव्हल-1) मध्ये एकच स्टेज टेस्ट असेल. दुसरा CBT नसेल. गट डी परीक्षा उत्तीर्ण होणार्‍या उमेदवाराला शारीरिक क्षमता चाचणी म्हणजेच पीईटी उत्तीर्ण करावी लागेल. शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) निकष पुरुष उमेदवारांसाठी 35 किलो वजनासह 100 मीटरचे अंतर 2 मिनिटांत कापावे लागेल. एक किलोमीटर 4 मिनिटे 15 सेकंदात धावावे लागेल. राज्यातील ग्रॅज्युएट्ससाठी थेट अधिकारी होण्याची संधी; MPSC कडून तब्बल 1037 जागांसाठी भरतीची घोषणा; करा अप्लाय महिला उमेदवारांसाठी 20 किलो वजनासह, तुम्हाला 2 मिनिटांत 100 मीटर धावावे लागेल. एक किलोमीटर 5 मिनिटे 40 सेकंदात धावावे लागेल. आरआरबी ग्रुप डी दस्तऐवज पडताळणी RRB गट डी भरती प्रक्रियेचा तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणीचा असेल. जे उमेदवार शारीरिक कार्यक्षमता चाचणीत पात्र ठरतील त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. कागदपत्र पडताळणीसाठी, रिक्त पदांपेक्षा दुप्पट उमेदवारांना आमंत्रित केले जाईल. गुणवत्ता आणि पर्यायाच्या आधारे कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या