मुंबई, 24 डिसेंबर: राज्यात काही दिवसांआधी अनेक वर्ष रडून असलेली पोलीस भरती जाहीर करण्यात आली. राज्य सरकारकडून पोलीस भरतीसाठी तब्बल 18,000 जागांसाठी भरती केली जाणार आहे. राज्यभरातील तरुण तरुणी या भरतीसाठी अभ्यास आणि सराव करत आहेत. 9 नोव्हेंबर पासून सुरु करण्यात आलेली ही नोंदणी प्रक्रिया 15 डिसेंबरपर्यंत चालू होती. यामध्ये सुमारे 18 लाख पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले आहेत. म्हणजेच एका पोस्टसाठी तब्ब्ल हजार उमेदवारांनी अर्ज केलं आहेत. पोलीस भरतीची शारीरिक चाचणी येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे. 02 जानेवारी 2023 पासून शारीरिक चाचणीला सुरुवात होणार आहे. पण त्या आधी या चाचणीसाठीचं हॉल तिकीट नक्की कसं डाउनलोड करावं हे जाणून घेऊया.
अशी असेल शारीरिक चाचणी
पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण तर महिला उमेदवार 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील.
परीक्षेच्या तारखेला उमेदवारांनी त्यांची शारीरिक चाचणी प्रवेशपत्रे परीक्षा केंद्रावर सोबत आणणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर शारीरिक चाचणी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
अशा पद्धतीनं डाउनलोड करा हॉल तिकीट
सुरुवातीला https://policerecruitment2022.mahait.org/ या अधिकृत पोर्टलवर जा.
"महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल शारीरिक चाचणी / ग्राउंड टेस्ट अॅडमिट कार्ड 2022" शोधा.
प्रश्न तपशील भरून वेबसाइटवर लॉग इन करा.
लॉग इन केल्यानंतर तुमचे हॉल तिकीट तुमच्या डिस्प्लेवर उघडेल.
ते सेव्ह करा आणि पीडीएफमध्ये डाउनलोड करा.
प्रवेशपत्रावर नमूद केलेले तपशील योग्यरित्या तपासा आणि काही विसंगती आढळल्यास ताबडतोब संबंधित प्राधिकरणाला कळवा.
तुमच्या रेकॉर्डसाठी प्रवेशपत्राची वैध प्रिंटआउट घ्या.
ग्रॅज्युएट्ससाठी पुण्यात जॉबची सर्वात मोठी संधी; या कंपनीत ऑफ कॅम्पस ड्राइव्हची घोषणा; थेट मुलाखत
अशी असेल लेखी परीक्षा
100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल जी 90 मिनिटांत पूर्ण करावी लागेल PST आणि PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत. परीक्षा मराठीतूनच होणार आहे. परीक्षेचा एकूण कालावधी 1:30 तासांचा आहे. त्यामध्ये 100 प्रश्न असतील ज्यात प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल. पोलीस भारती 2022 च्या प्रश्नपत्रिकेत चार स्वतंत्र विभाग असतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Job, Jobs Exams, Maharashtra police, Mumbai police