संग्रहित छायाचित्र
मुंबई, 10 मे : तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल आणि तुमच्याकडे अवजड वाहनं चालवण्याचं कौशल्य, वाहन परवाना असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण पोस्ट विभागात स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. हे पद तीन वर्षं कालावधीसाठी प्रतिनियुक्ती/ अवशोषण आधारावर पोस्ट विभागातील हिस्सार आणि रोहतक विभागांतर्गत भरलं जाणार आहे. या पदासाठी शैक्षणिक तसेच अन्य निकष निश्चित करण्यात आले आहेत. पोस्ट विभागाच्या रोहतक आणि हिस्सार येथील विभागात स्टाफ कार ड्रायव्हरच्या दोन पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या संदर्भात पोस्ट विभागाने अधिकृत नोटिफिकेशन जारी केलं आहे. पोस्ट विभागाने जारी केलेल्या अधिकृत नोटिफिकेशननुसार, या पदासाठी इच्छुक उमेदवाराचे वय 10 मे 2023 रोजी 56 वर्षांपेक्षा जास्त नसावं. स्टाफ कार ड्रायव्हर या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना 7 व्या सीपीसी वेतन नियमानुसार पे मॅट्रिक्स स्तर 02 प्रमाणे दरमहा वेतन दिलं जाईल. ही नियुक्ती प्रतिनियुक्तीच्या आधारावर केली जाईल आणि निवड झालेल्या उमेदवारांचा नियुक्ती कालावधी तीन वर्षांसाठी असेल. वाचा - UGC NET 2023 परीक्षेसाठी आजपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात; असं लगेच करा रजिस्टर स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी पोस्ट विभागातील 7 व्या सीपीसी नुसार पे मॅट्रिक्स लेव्हल -01 (18000-56900) मधील नियमित डिस्पॅच रायडर किंवा ग्रुप सी कर्मचाऱ्यापैकी जो अर्ज करू इच्छितो त्याच्याकडे हलकी आणि जड वाहन चालवण्यासाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असावं, तसंच त्याने हलकं आणि जड वाहन चालवण्याच्या क्षमतेचं मूल्यांकन करण्यासाठी आवश्यक असलेली ट्रेड टेस्ट किंवा ड्रायव्हिंग टेस्ट दिलेली असावी. उमेदवारांची पोस्टल डायरेक्टरेट F.No. 08-01/2019-SPN-I dated 17.06.2022 द्वारे अधिसूचित पॅटर्न आणि अभ्यासक्रमानुसार विभागाद्वारे चाचणी घेतली जाईल. स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्जाचा नमूना डाउनलोड करून घ्यावा. त्यानंतर हा अर्ज योग्य कागदपत्रांसह असिस्टंट डायरेक्टर, पोस्टल सर्व्हिस -I O/o द चीफ पोस्ट मास्टर जनरल, हरियाणा सर्कल, द मॉल, अंबाला कँटोन्मेंट - 133001 या पत्त्यावर अंतिम मुदतीपूर्वी पाठवावा. अर्ज पाठवण्यासाठी अन्य कोणतीही पद्धत नाही. तसेच 10 मे 2023 या अंतिम मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज रिजेक्ट केले जातील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. या पदाच्या भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी पोस्ट विभागाकडून जारी करण्यात आलेली अधिकृत नोटिफिकेशन्स काळजीपूर्वक वाचावी.