JOIN US
मराठी बातम्या / करिअर / NEET UG 2023 Result: आजच जारी होऊ शकतो NEET UG परीक्षेचा निकाल; या लिंकवरून लगेच करा चेक

NEET UG 2023 Result: आजच जारी होऊ शकतो NEET UG परीक्षेचा निकाल; या लिंकवरून लगेच करा चेक

NEET UG 2023 Result: हा निकाल जाहीर झाल्यानंतर कसा चेक करायचा आणि या आधीच्या वर्षीचा कट ऑफ किती होता याबद्दल माहिती जाणून घेऊया.

जाहिरात

आजच जारी होऊ शकतो NEET UG परीक्षेचा निकाल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13, जून: देशातील भावी डॉक्टरांसाठी महत्त्वाची ,माहिती समोर आली आहे. NEET UG 2023 च्या निकालाबाबत मोठी अपडेट आली आहे. NTA आज म्हणजेच 13 जून रोजी NEET UG निकाल जाहीर करू शकते. ऑल इंडिया रँक टॉपर्स आणि कट-ऑफ पर्सेंटाइलच्या घोषणेसह, NTA अंतिम उत्तर की देखील जारी करेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तरी हा निकाल जाहीर झाल्यानंतर कसा चेक करायचा आणि या आधीच्या वर्षीचा कट ऑफ किती होता याबद्दल माहिती जाणून घेऊया. NEET UG चा निकाल जाहीर झाल्यानंतर, निकाल तपासण्याची लिंक NTA वेबसाइट neet.nta.nic.in वर उपलब्ध असेल. यावर्षी NTA ने NEET UG परीक्षा दोनदा घेतली होती. पहिली वेळ 7 मे रोजी आणि दुसरी वेळ 6 जून रोजी झाली. पात्रता फक्त 7वी-10वी अन् महिन्याचा तब्बल 1,32,300 रुपये पगार; अर्जाला अवघे काही तास शिल्लक; घ्या Link NEET UG कट-ऑफबद्दल बोलायचे तर, गेल्या वर्षी सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांसाठी कट-ऑफ 715-117 होता. SC/ST आणि OBC साठी कट ऑफ 116 होता. OBC आणि SC, ST अपंग उमेदवारांसाठी कट ऑफ 104-93 होता. NEET UG MBBS आणि BDS कट-ऑफ सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी 50, OBC, SC आणि ST साठी 40 होते. सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी; थेट DRDO मध्ये जॉब ओपनिंग्स; तुम्ही आहात का पात्र? बघा 20 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा 7 मे रोजी झालेल्या NEET UG परीक्षेत एकूण 20,87,449 उमेदवार बसले होते. 6 जून रोजी झालेल्या परीक्षेत मणिपूरमधून 8,753 उमेदवार बसले होते. 6 जून रोजी मणिपूरमधील 11 शहरांमधील 34 परीक्षा केंद्रांवर परीक्षा झाली.

असा चेक करा तुमचा निकाल सर्वप्रथम NTA वेबसाइट neet.nta.nic.in 2023 ला भेट द्या आता ‘उमेदवार क्रियाकलाप’ अंतर्गत NEET UG 2023 निकाल स्कोअरकार्ड लिंकवर क्लिक करा आता एक विंडो उघडेल, येथे NEET UG अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा आता NEET UG 2023 चा निकाल उघडला जाईल आता NEET UG 2023 स्कोअर कार्ड डाउनलोड करा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या