JOIN US
मराठी बातम्या / करिअर / मोठी बातमी! पुण्यात MPSC चे विद्यार्थी आक्रमक; या मागण्यांसाठी आयोगाविरोधात आंदोलन; VIDEO

मोठी बातमी! पुण्यात MPSC चे विद्यार्थी आक्रमक; या मागण्यांसाठी आयोगाविरोधात आंदोलन; VIDEO

आता पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत जाणून घेऊया.

जाहिरात

'या' मागण्यांसाठी आयोगाविरोधात आंदोलन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 डिसेंबर: महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC ची तयार राज्यातील लाखो तरुण करत असतात. अगदी आपल्या आयुष्याची कित्येक वर्ष सरकारी नोकरीसाठी आणि MPSC परीक्षा पास करण्यासाठी हे विद्यारही घालवत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून MPSC च्या विद्यार्थ्यांना आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आंदोलन करावं लागतं आहे. तसंच गेल्यावर्षी पुण्यातील MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येपासून MPSC बद्दल विद्यार्थ्यांमध्ये रोष आहे. मात्र आता पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत जाणून घेऊया. ग्रॅज्युएट्ससाठी पुण्यात जॉबची सर्वात मोठी संधी; या कंपनीत ऑफ कॅम्पस ड्राइव्हची घोषणा; थेट मुलाखत काही दिवसांपूर्वी MPSC नं परीक्षेच्या पॅटर्नमध्ये आणि सिलॅबसमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला होता. येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजेच 2023 मध्ये MPSC चा संपूर्ण अभ्यासक्रम बदलून नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. मात्र यावर कित्येक वर्षांपासून अभ्यास करणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. अचानक अभ्यासक्रम बदलल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार नाही आणि कित्येक वर्षांची मेहनत वाया जाऊ शकते असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे हा नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात यावा अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

तसंच गेल्या कित्येक वर्षांपासून MPSC च्या परीक्षांमध्ये घोटाळे होत आहेत. उत्तर पत्रिकेत घोळ किंवा प्रश्नपत्रिकेत चूक होत आहे यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत म्हणूनच अशा प्रकारांवर MPSC नं लक्ष द्यावं अशीही मागणी विद्यार्थी करत आहेत. सर्वात मोठी खूशखबर! 10वी पाससाठी मध्य रेल्वेची घोषणा; राज्यात तब्बल 2422 जागांसाठी मेगाभरती तसंच आंदोलन केलं तर विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई करू अशी भूमिका घेणारं ट्विट MPSC नं केलं आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे हे मान्य केलं जाणार नाही असंही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. तसंच MPSC विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेत माही असंही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या