JOIN US
मराठी बातम्या / करिअर / विद्यार्थ्यांनो, MPSC Crack करणं कठीण नाही; 'या' टिप्सचा वापर करून व्हा अधिकारी; वाचा सविस्तर

विद्यार्थ्यांनो, MPSC Crack करणं कठीण नाही; 'या' टिप्सचा वापर करून व्हा अधिकारी; वाचा सविस्तर

आज आम्ही तुम्हाला MPSC परीक्षेचा अभ्यास करण्याच्या आणि त्यासंबंधीची तयारी करण्याच्या काही टिप्स देणार आहोत.

जाहिरात

MPSC परीक्षेचा अभ्यास करण्याच्या टिप्स

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 03 मार्च: महाराष्ट्र लोक सेवा आयोग म्हणजेच MPSC. दरवर्षी या परीक्षेला राज्यातील लाखो उमेदवार बसतात. अनेकांना परीक्षा दिल्यानंतर स्वतःच्या मेहनतीवर अधिकारी बनण्याची संधीही (MPSC Success story) मिळते. मात्र हे संधी मिळण्यासाठी अतोनात परिश्रम आणि मेहनत (Efforts required to crack MPSC) घ्यावी लागते. जीवाचं रान करून अभ्यास करावा लागतो. तसंच काही विद्यार्थी यासाठी निरनिराळ्या प्रकारचे क्लासेसही (Best Classes for MPSC Preparation) लावतात. या क्लासेसचं शुल्क लाखोंच्या घरात असतं. प्रत्येक उमेदवाराला ते परवडेलच असं नाही. मात्र आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला MPSC परीक्षेचा अभ्यास करण्याच्या (How to study smartly for MPSC) आणि त्यासंबंधीची तयारी करण्याच्या काही टिप्स (Tips and Tricks to crack MPSC in Single attempt) देणार आहोत. विशेष म्हणजे या टिप्स वापरून तुम्ही घरबसल्या अभ्यास करू शकाल. चला तर मग जाणून घेऊया. विद्यार्थ्यांनो, तुम्हीही JEE Mains परीक्षा देणार आहात? मग अशी करा Crack; वाचा अभ्यासाचा आराखडा तयार करा अभ्यासाचा आराखडा बनवला पाहिजे जेणेकरुन सर्व महत्त्वाचे विभाग आणि विषयांचा नीट समावेश करता येईल. अभ्यासाचा आराखडा बनवणे खूप महत्त्वाचे आहे पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे अभ्यासाच्या आराखड्याचे पालन करणे. तुमच्या अभ्यास योजनेचे प्रामाणिकपणे पालन करा तरच तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. Syllabus समजून घेणं आवश्यक जर तुम्हाला UPSC IFS परीक्षेचा अभ्यासक्रम माहित नसेल तर तुम्ही परीक्षेची चांगल्या प्रकारे तयारी करू शकणार नाही. म्हणूनच पहिले संपूर्ण MPSC चा अभ्यासक्रम समजून घेणं आवश्यक आहे. त्यानुसार तयारीची रणनीती बनवा. जर तुम्हाला अभ्यासक्रम माहित असेल तर तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार आणि आवडीनुसार कमकुवत आणि मजबूत विभाग ओळखून अभ्यासाला सुरुवात करू शकता. Government Jobs: MPSC तर्फे ‘या’ पदांच्या तब्बल 168 जागांसाठी भरतीची घोषणा चुकांमधून घ्या बोध प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी तुमच्या चुकांमधून शिकणे महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या चुका समजून घेण्यासाठी वेळ काढल्यास, तुम्ही एखादी विशिष्ट चूक का केली आणि भविष्यात ती टाळण्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे, तुम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळतील याची खात्री आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या