मंत्रालयात काम करण्याची संधी, इंजिनिअर्ससाठी जागा
नवी दिल्ली, 10 जून : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयांतर्गत असिस्टंट इंजिनीअर या पदावर भरती केली जाणार आहे. त्यासाठी भारतीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयांतर्गत केंद्रीय भूजल मंडळाच्या जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागात असिस्टंट इंजिनीअर या एका पदाच्या चार रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. हे पद जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप बीचं असून, गॅझेटेड असलं तरी नॉन-मिनिस्टेरियल आहे, असं अधिसूचनेत म्हटलं आहे. तसंच ही नियुक्ती पर्मनंट असेल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. पेस्केल 8 (47,600-1,51,100) आणि लागू असलेले अलाउन्स एवढं वेतन निवड झालेल्या उमेदवाराला मिळेल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. अर्ज करण्यासाठी 15 जून 2023 ही शेवटची मुदत असून, ही प्रक्रिया ऑनलाइन करायची आहे. त्यासाठीची लिंक (UPSC ORA LINK) बातमीच्या शेवटी दिली आहे. एकूण चारपैकी दोन जागा राखीव असून, दोन जागा अनारक्षित अर्थात खुल्या प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी आहेत. खुल्या प्रवर्गातल्या इच्छुक उमेदवारांचं वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावं. केंद्र सरकारी किंवा केंद्रशासित प्रदेशात सरकारी नोकरी करत असलेल्या उमेदवारांना वयोमर्यादेत पाच वर्षांची सवलत मिळू शकते. वयोमर्यादेत सवलतीबाबतची सविस्तर माहिती अधिकृत नोटिफिकेशनमधून घ्यावी. इच्छुक उमेदवारांकडे ड्रिलिंग/मायनिंग/मेकॅनिकल/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इंजिनीअरिंग/पेट्रोलियम टेक्नॉलॉजी यांपैकी कोणत्याही एका विषयात मान्यताप्राप्त संस्थेतून घेतलेली पदवी हवी. तसंच, ऑटोमोबाइल मशिन्स आणि इक्विपमेंट्सच्या दुरुस्तीचा एका वर्षाचा अनुभव हवा किंवा ड्रिलिंग रिगच्या ऑपरेशन आणि मेन्टेनन्सचा एका वर्षाचा अनुभव हवा. निवडीसाठी तोंडी परीक्षा, तसंच पर्सनॅलिटी टेस्ट घेतली जाणार आहे. भरतीचे काही निकषही यूपीएससीने निश्चित केले आहेत. महिला आणि आरक्षित वर्गातल्या उमेदवारांना अर्जशुल्क माफ असून, ईडब्ल्यूएस/ओबीसी वर्गातल्या उमेदवारांना 25 रुपये अर्ज शुल्क भरावं लागणार आहे. अधिकृत नोटिफिकेशन पुढील लिंकवर पाहू शकता. https://upsconline.nic.in/ora/Detail.php?post=MjAyNgKIY5AXPXJI9G3CSVL6AUKLAC7INQOAZACKMA1NSWXXFIDH2DQC&case=MjIxNwFV1ZIAA7CQUCWCYJSQC3ODKI9XDN5MXGHLSLKNA2ICPAAXIA6X&id=MQXCOQXXYSIKP7N1JUAQWLAA3CZXG5ICLCCISAVDAK2MI6KNFAD9