इथे लगेच रोल नंबर टाका आणि बघा तुमचा दहावीचा निकाल
मुंबई, 02, जून: महाराष्ट्र राज्य दहावीचा निकाल (Maharashtra Board 10th Result) अखेर घोषित करण्यात आला आहे. News18लोकमत आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या (Maharashtra board result 2023) वेबसाईटवर हा निकाल विद्यार्थ्यांना लाईव्ह बघता येणार आहे. . त्यामुळे आता विद्यार्थी आणि पालकांच्या मनात धाकधूक वाढली आहे. गेल्या वर्षी ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे निकाल काही प्रमाणात कमी लागला होता. मात्र महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा वर्ष 2023 चा निकाल हा 93.83 टक्के लागला आहे. इथे लगेच तुमचा रोल नंबर टाका आणि बघा रिझल्ट
असा चेक करा तुमचा निकाल सुरुवातीला https://lokmat.news18.com/news/career/board-results-maharashtra-board/ ही लिंक ओपन करा. यानंतर तुम्हाला बातमीच्या मध्ये एक बॉक्स दिसेल. यात तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. यांनतर आईचं नाव लिहायचं आहे. यानंतर तुम्हाला तुमचा क्लास म्हणजे दहावी की बारावी हे सिलेक्ट करायचं आहे. यानंतर खाली देण्यात आलेल्या गणिताच्या कोड्याचं उत्तर द्यायचं आहे. यांनतर तुम्हाला तुमचा निकाल थेट वेगवान पद्धतीनं बघता येणार आहे. यानंतर हा निकाल तुम्हाला सेव्हही करता येणार आहे.