आधी 'या' 3 लोकांना जाऊन भेटा
मुंबई, 31 मे: चांगलं शिकून चांगले मार्क्स आणणार नाही आणलेत तर चांगली नोकरी मिळणार नाही आणि चांगली नोकरी मिळाली नाही तर पैसे मिळणार नाही असं नेहमीच आपल्यापेक्षा वयानं आणि अनुभवानं मोठे लोक आपल्याला सांगत असतात. अर्थात हे काही चुकीचं नाही. चांगल्या नोकरीसाठी चांगले मार्क्स आणणं महत्त्वाचं आहेच. मात्र काही विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे मार्क्स मिळू शकत नाहीत. अशा वेळी विद्यार्थी आणि पालक टेन्शन घेतात. आता आपला पाल्य चांगल्या क्षेत्रात करिअर करू शकणार नाही असं त्यांना वाटतं. मात्र आता चिंता करू नका. कमी मार्क्स असणारे विद्यार्थीही चांगलं करिअर करू शकतात. यासाठी फक्त काही गोष्टी करण्याची अत्यंत गरज आहे. याचबद्दलच्या टिप्स एक्सपर्ट्सनी दिल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया. महाराष्ट्र स्टेट बोर्डचा दहावीचा निकाल ही याच आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर दहावीच्या निकालामध्ये तुम्हला अचांगके मार्क्स मिळू शकले नाहीत. तर अजिबात निराश होऊ नका. सर्वात आधी खाली दिलेल्या पैकी किमान एक काम करा. तुम्हाला कधीच नैराश्य येणार नाही.
तुमच्या शिक्षकांना भेटा दहावीनंतर अनेक विद्यार्थी सायन्स किंवा कॉमर्समध्ये प्रवेश घेतात. यापैकी अनेकजणांना डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचं असतं. म्हणून कमी मार्क्स मिळालेले विदयार्थी निराश होतात. सायन्स आणि कॉमर्समध्येच स्कोप आहे आर्टस्मध्ये काहीच स्कोप नाही भविष्य नाही असं त्यांना वाटतं. मात्र असं काहीही नाही. आर्टस्मध्येही करिअरच्या अनेक संधी आहे. याबद्दल तुम्हाला माहिती नसेल किंवा अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुमच्या शिक्षांना भेटून त्यांच्याशी पुढील वाटचालीबद्दल बोलणं महत्त्वाचं आहे. कदाचित्त तुम्हाला ते असा पर्याय देतील ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. म्हणूनच कमी मार्क्स मिळाले असतील तर सर्वात आधी शिक्षकांना भेटणं आवश्यक आहे. SSC Result 2023: 10वीचा निकाल काहीही येऊ देत; करिअर पुढे न्यायचंय ना? मग ‘हे’ ऑप्शन्स ठरतील बेस्ट करिअर काउन्सिलरचा सल्ला घ्या दहावीत कमी मार्क्स मिळाले म्हणून निराश हताश बसणारे अनेक विद्यार्थी असतात. अपेक्षेप्रमाणे मार्क्स मिळाले नाहीत तर काही विद्यार्थी शिक्षण सोडण्याचा निर्णयही घेतात. मात्र याला काहीच अर्थ नाही. त्यापेक्षा तुमच्या शहरातील करिअर काउन्सिलरला भेटा. कारवर काउन्सिलर तुमची एक छोटी बुद्धिमत्ता चाचणी घेऊन तुम्हाला कुठे आवड आहे हे ओळखतात आणि त्यानुसार तुम्हाला शिक्षण घेण्याचा सल्ला देतात. बरेचदा करिअर काउन्सिलरचा सल्ला घेतल्यामुळे अनेकांना करिअरची नवी दिशा मिळते. SSC Result 2023: लक्ष द्या! 10वीनंतर फक्त 12वी हाच पर्याय नाही; ‘हे’ शॉर्ट टर्म कोर्सेस करूनही होऊ शकता मालामाल सिनिअर्सची मदत घ्या तुमच्या आधीच्या बॅचचे किंवा तुमच्या ओळखीतील अशा काही मोठ्या ताई-दादांना भेटा ज्यांनी चांगले करिअर घडवले आहेत. तसंच कमी मार्क्स मिळवूनही ज्यांनी चांगलं करिअर घडवलं आहे अशा लोकांना भेटा. त्यांचा सल्ला, त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच कमी येईल आणि करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी शिक्षणासाठी मदत करेल.