JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Maharashtra SSC Board Result 2023 : 10वीनंतर डिप्लोमा की 12वी? अजूनही कन्फ्युज्ड आहात? फरक बघा आणि घ्या योग्य निर्णय

Maharashtra SSC Board Result 2023 : 10वीनंतर डिप्लोमा की 12वी? अजूनही कन्फ्युज्ड आहात? फरक बघा आणि घ्या योग्य निर्णय

Ssc Result 2023 Updates In Marathi: आज आम्ही तुम्हाला 10वीनंतर डिप्लोमा की 12वी यातील चांगल्या पर्यायांबाबत सांगणार आहोत.

जाहिरात

फरक बघा आणि घ्या योग्य निर्णय

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 मे: महाराष्ट्र राज्य स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल  (ssc result 2023 maharashtra board) काही दिवसात जाहीर होणार आहे. मात्र यंदा परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं झाल्या असल्यामुळे लवकरच अकरावीसाठी आणि डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहेत. रजिस्ट्रेशन सुरु करण्यात येणार आहेत. आता विद्यार्थ्यांसमोर प्रवेशासाठीची मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकदा विद्यार्थी पॉलिटेक्निक की बारावी यासंदर्भात संभ्रमात असतात. यापैकी पुढील शिक्षणाच्या दृष्टीनं चांगला पर्याय कोणता याबाबत निर्णय घेऊ शकत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला 10वीनंतर  डिप्लोमा की 12वी यातील चांगल्या पर्यायांबाबत सांगणार आहोत. त्याआधी खालीलप्रमाणे तुम्हाला News18Lokmat वर दहावीची निकाल (maharashtra ssc result 2023) पाहता येणार आहे.

Maharashtra SSC Board Result 2023: 10वीच्या निकालाची लवकरच होणार घोषणा; इथे काही सेकंदांत दिसणार रिझल्ट

इंजिनीरिंग डिप्लोमा / पॉलीटेक्नीक दहावी नंतर थेट इंजिनिअरिंग डिप्लोमाला प्रवेश मिळतो. हा डिप्लोमा तीन वर्षांचा असतो. कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जुनिअर इंजिनीअरचा डिप्लोमा मिळतो. विशेष म्हणजे जर तुम्हाला इंजिनिअर व्हायचा असेल तर तुमच्या पुढील शिक्षणासाठी पॉलिटेक्निक हा उत्तम पर्याय असतो. यात अनेक ब्रान्चमध्ये तुम्हाला शिक्षण घेता येतं. इलेक्ट्रिकल, मॅकेनिकल, सिव्हिल, कम्युटर अशा अनेक ब्रांचमध्ये शिक्षण घेता येतं. इंजिनिअरिंगचे बरेचशे मुद्दे डिप्लोमा करताना समजतात आणि त्यामुळे पुढे अडचण येत नाही. प्रॅक्टिकल ज्ञानसाठीही डिप्लोमा हा उत्तम पर्याय आहे. SSC Result 2023: लक्ष द्या! 10वीनंतर फक्त 12वी हाच पर्याय नाही; ‘हे’ शॉर्ट टर्म कोर्सेस करूनही होऊ शकता मालामाल डिप्लोमाला प्रवेश घेतल्यानंतर जर इतर कोणत्या शाखेत म्हणजे कॉमर्स, कला क्षेत्रात जाण्याची तुमची इच्छा झाली तर ते शक्य होत नाही. यासाठ बारावी असणं महत्त्वाचं असतं. डिप्लोमानंतर डिग्रीसाठी इंजिनिअरिंगशिवाय दुसरा पर्याय नसतो. बरेच विद्यार्थी डिप्लोमानंतर जॉबही करतात. अशा विद्यार्थ्यांना सुपरवायजर किंवा जुनिअर इंजिनिअर म्हणून जॉब मिळतो. 10वीनंतर 12वीला प्रवेश घ्यायचाय? मग ‘हे’ आहेत मुंबईतील टॉप ज्युनिअर कॉलेजेस बारावीचं शिक्षण दहावीनंतर बरेच विद्यार्थी अकरावी आणि बारावी करतात. यामध्ये विद्यार्थ्यांना अकरावीची परीक्षा कॉलेजकडूनच असते मात्र बारावीमध्ये बोर्डाची परीक्षा असते. ज्या विद्यार्थ्यांना कॉमर्स, आर्ट्स या शाखांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांना बारावीशिवाय दुसरा पर्याय नसतो. तसंच अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंग प्रवेशासाठी बारावीनंतर JEE ची परीक्षा देतात. ज्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर नक्की कोणत्या क्षेत्रात डिग्री घ्यायची आहे हे माहिती नसतं त्यांना बारावीला प्रवेश घेता येऊ शकतो. बारावीमध्ये विद्यार्थ्यांना गणिताचं ज्ञान मिळतं. तसंच बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेला वेळही मिळतो. SSC Result 2023: 10वीचा निकाल काहीही येऊ देत; करिअर पुढे न्यायचंय ना? मग ‘हे’ ऑप्शन्स ठरतील बेस्ट डिप्लोमाप्रमाणे बारावीनंतर लगेच जॉब करता येत नाहीत. सरकारी नोकरीसाठी बारावीनंतर पर्याय असतो. मात्र शिक्षणाच्या बाबतीतील अनेक मार्ग बारावीनंतर मोकळे होतात. या सर्व गोष्टींना लक्षात घेऊनच विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या