JOIN US
मराठी बातम्या / करिअर / शिंदे-फडणवीस सरकारचा मोदी फॉर्म्युला! येत्या एका वर्षात तब्बल 75000 सरकारी नोकऱ्या देण्याची घोषणा

शिंदे-फडणवीस सरकारचा मोदी फॉर्म्युला! येत्या एका वर्षात तब्बल 75000 सरकारी नोकऱ्या देण्याची घोषणा

आता महाराष्ट्र सरकारनही राज्यात 75000 सरकारी नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. या नोकऱ्या वर्षभरात दिल्या जातील

जाहिरात

फडणवीस- शिंदे सरकार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 ऑक्टोबर: बेरोजगारीच्या मुद्द्यावरून देशातील विरोधक सातत्याने मोदी सरकारला घेरत आहेत, त्यामुळे भाजपच्या राज्य घटकांनाही निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्रास सहन करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळाव्याचं उद्घाटन केलं. यानंतर आता महाराष्ट्र सरकारनही राज्यात 75000 सरकारी नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. या नोकऱ्या वर्षभरात दिल्या जातील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. राज्यातील रोजगार निर्मितीच्या सूत्राबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पंतप्रधानांनी सुरू केलेल्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमच्या सरकारनेही नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. 75000 नोकऱ्यांपैकी 18000 रिक्त पदे आहेत. “पोलीस खात्यात असेल. येत्या 5 ते 7 दिवसांत याची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.” अधिकारी होऊन तब्बल 2 लाख रुपये महिना सॅलरीची नोकरी; MPSC तर्फे भरतीची घोषणा या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना 10 लाख नोकऱ्या देण्याचा उपक्रम उत्कृष्ट असल्याचे म्हटले आहे. जूनमध्ये, पंतप्रधानांनी विविध सरकारी विभाग आणि मंत्रालयांना पुढील दीड वर्षांत मिशन मोडवर 10 लाख लोकांना नोकऱ्या देण्यास सांगितले होते. तेव्हापासून भाजपशासित सरकार आणि केंद्र सरकारचे विभाग सतत सरकारी नोकऱ्यांसाठी भरती करत आहेत. 75,000 तरुणांना अपॉइंटमेंट लेटर्स आणि 10 लाख नोकऱ्या; रोजगार मेळावा लाँच 22 ऑक्टोबर रोजी मोदी सरकारने रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करून 75,000 हून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्यांचे जॉइनिंग लेटर दिले होते. यावेळी ते म्हणाले होते की, युवकांसाठी अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी केंद्र अनेक आघाड्यांवर काम करत आहे. JOB ALERT: महिन्याचा तब्बल 67,000 रुपये पगार; NCERT मध्ये ‘या’ पदांसाठी बंपर भरती; लगेच करा अर्ज जूनमध्ये पंतप्रधानांनी विविध सरकारी विभाग आणि मंत्रालयांना पुढील दीड वर्षात ‘मिशन मोड’वर १० लाख लोकांना नोकऱ्या देण्यास सांगितले होते. मोदींनी शनिवारी 75,000 सरकारी नोकरीच्या उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले आणि सांगितले की केंद्र तरुणांसाठी अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या