JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Maharashtra Board Supplementary Exams: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; पुरवणी परीक्षांसाठी उद्यापासून अर्ज प्रक्रिया होणार सुरु

Maharashtra Board Supplementary Exams: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; पुरवणी परीक्षांसाठी उद्यापासून अर्ज प्रक्रिया होणार सुरु

विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा ही जुलै आणि ऑगस्टमध्येच घेतली जाणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार नाही अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.

जाहिरात

पुरवणी परीक्षांसाठी उद्यापासून अर्ज प्रक्रिया

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 जून: नुकताच महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत अपयश आलं त्यांच्यासाठी पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. जे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले किंवा अपयशी ठरले अशा विद्यार्थ्यांना खचून जाण्याची गरज नाही. अशा विद्यार्थ्यांना अजून एक चान्स मिळणार आहे. अशा विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा ही जुलै आणि ऑगस्टमध्येच घेतली जाणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार नाही अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. … अन् सीमेवर दिसू लागली अदृश्य सावली; सैन्याचा ‘तो’ वीर जवान जो मृत्यूनंतरही करतोय देशाचं रक्षण कधीपासून सुरु होईल अर्ज प्रक्रिया दहावीच्या परीक्षेत अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांना उद्यापासून म्हणजेच 07 जूनपासून पुरवणी परीक्षांसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार आहे. तर अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 16 जून असणार आहे. विद्यार्थ्यांना हे अर्ज ऑनलाईन पद्धतीनं भरायचे आहेत. तसंच विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क हे चालान पद्धतीनं भरायचं आहे. NIRF Rankings: देशातील टॉप युनिव्हर्सिटीजमध्ये महाराष्ट्रातील एकही विद्यापीठ नाही; नक्की कारण काय? काय असेल चलनाद्वारे अर्जाची मुदत ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर विद्यार्थ्यांना बँकेतून चलनाद्वारे अर्ज करायचे आहेत. यासाठी चलनाद्वारे शुल्क भराव लागणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना 08 जून ते 22 जूनपर्यंत अर्ज भारत येणार आहेत. तर विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना 17 जून ते 21 जूनपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. UPSC Exam Tips: IAS, IPS व्हायचंय ना? मग UPSC परीक्षेत ‘या’ चुका कधीच करू नका; हातचा जाईल जॉब अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुरवणी परीक्षा या जुलै महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला घेण्यात येणार आहेत अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत अपयश आलं आहे त्यांनी या वेळेत अभ्यास करून पास होण्याची संधी आहे. अप्लाय करण्यासाठी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या ऑफिशिअल वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या