JOIN US
मराठी बातम्या / करिअर / SSC Result 2022 : 43 वर्षांचे वडील 10 वी च्या परीक्षेत पास तर मुलगा झाला नापास

SSC Result 2022 : 43 वर्षांचे वडील 10 वी च्या परीक्षेत पास तर मुलगा झाला नापास

पुण्यातील 43 वर्षांच्या भास्कर वाघमारे (Bhaskar Vaghmare, Pune) यांनी त्यांच्या मुलासह यंदा 10 वीची परीक्षा दिली. या परीक्षेत ते पास झाले, पण त्यांचा मुलगा मात्र नापास झाला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 जून : राज्यातील 10 वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यामधील काही महत्त्वाचे अपडेट्स आता समोर येत आहेत. मुंबईतील जुळ्या भावांना सारखेच मार्क्स मिळाले आहेत. त्यांची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू असतानाच आणखी एक अनोखा निकाल संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. पुण्यातील 43 वर्षांच्या भास्कर वाघमारे (Bhaskar Vaghmare, Pune) यांनी त्यांच्या मुलासह यंदा 10 वीची परीक्षा दिली. या परीक्षेत ते पास झाले, पण त्यांचा मुलगा मात्र नापास झाला. पुण्यातील बाबासाहेब आंबेडकर भागात राहणाऱ्या वाघमारे खासगी क्षेत्रात नोकरी करतात. त्यांना घरातील अडचणीमुळे सातवीनंतर शिक्षण सोडून द्यावे लागले होते. 30 वर्षांच्या गॅपनंतर त्यांनी मुलासोबत परीक्षा दिली आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले. ‘माझी नेहमीच शिक्षणाची इच्छा होती. पण, घरातील जबाबदारीमुळे ते जमले नाही. काही वर्षांनी मी पुन्हा शिक्षण घेण्याचं आणि कोर्स करण्याचं ठरवलं. या शिक्षणामुळे मला अधिक कमाई करण्यास मदत होईल,’ असे वाघमारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आपण नियमितपणे दहावीच्या परीक्षेचा अभ्यास करत होतो. रोजचे काम झाल्यानंतर मी हा अभ्यास करत असे. माझा मुलगाही यंदा दहावीमध्ये होता. त्याचीही मला मदत झाली, असे वाघमारे यांनी यावेळी स्पष्ट केले. बोर्डाच्या परीक्षांमध्ये अपयशी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; पुरवणी परीक्षा आणि प्रॅक्टिकल्सचं वेळापत्रक जारी मुलगा देणार पुन्हा परीक्षा वाघमारे यांनी दहावीमध्ये यश मिळवले असले तरी त्यांच्या यशाला मुलगा नापास झाल्यानं काहीसं गालबोट लागलं. त्यांचा मुलगा दोन विषयांमध्ये नापास झाला. माझे वडील पास झाले याचा मला आनंद आहे. दहावीची परीक्षा पास होण्याची त्यांची इच्छा होती. ती पूर्ण झाली आहे. मी या अपयशानंतर हार मानणार नाही.  मी पुन्हा पुरवणी परीक्षेला बसणार आहे, असा निर्धार वाघमारे यांच्या मुलानं व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या