मुंबई, 19 जून: नुकताच महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल (Maharashtra state board results 2022) जाहीर करण्यात आला आहे. यात ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत अपयश आलं त्यांच्यासाठी पुरवणी परीक्षांच्या (Supplementary Exams 2022) तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. जे विद्यार्थी दहावीच्या किंवा बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले किंवा अपयशी ठरले अशा विद्यार्थ्यांना खचून जाण्याची गरज नाही. अशा विद्यार्थ्यांना अजून एक चान्स मिळणार आहे. अशा विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा (Time table of Supplementary Exams 2022) ही जुलै आणि ऑगस्टमध्येच घेतली जाणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार नाही अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कधी आहे पुरवणी परीक्षा बारावीचा पुरवणी परीक्षा ही 21 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत घेण्यात येणार आहे. तर दहावीमध्ये अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा ही 27 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत घेण्यात येणार आहे.या परीक्षांचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाणार आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत दिली आहे. 10वीत कमी मार्क्स आलेत, आता पुढे काय? काय आहे एक्सपर्ट्सचा सल्ला? वाचा काय म्हणाल्या शिक्षणमंत्री राज्य मंडळाच्या मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इ.10वी आणि इ.12वीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांना पुन्हा एक संधी देण्यासाठी आम्ही जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये पुरवणी परीक्षा घेणार आहोत. या परीक्षांचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे. पुरवणी परीक्षांच्या माध्यमातून श्रेणी/ गुणसुधार योजनेअंतर्गत आपली संपादणूक सुधारू इच्छिणाऱ्या किंवा उत्तीर्ण होऊ पाहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी नव्या उमेदीने आणि मेहनतीने अभ्यास करावा आणि या संधीचे सोने करावे.
राज्य मंडळाच्या मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इ.१०वी आणि इ.१२वीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांना पुन्हा एक संधी देण्यासाठी आम्ही जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये पुरवणी परीक्षा घेणार आहोत. या परीक्षांचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे. @msbshse pic.twitter.com/AjDeHZO6i8
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 19, 2022
कधी होणार तोंडी परीक्षा आणि प्रॅक्टिकल्स तसेच इ.12 वीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 20 जुलै ते 08 ऑगस्ट आणि इ. 10 वीच्या परीक्षा 26 जुलै ते 08 ऑगस्ट या दरम्यान होणार आहेत. सविस्तर वेळापत्रकासाठी http://mahahsscboard.in वर संपर्क साधावा तुमच्या आवडीच्या जुनिअर कॉलेजची यादी रेडी ठेवा; पुढील आठवड्यापासून दुसरा टप्पा
कधीपासून सुरु होणार अर्ज प्रक्रिया
या परीक्षांसाठी इ.10 वीच्या इच्छुक विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 20 जून पासून सुरू होईल, तर इ.12 वीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया 10 जूनपासून सुरू आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत दिली आहे.