JOIN US
मराठी बातम्या / करिअर / MH Board 10th and 12th Result: अखेर प्रतीक्षा संपली, पुढील आठवड्यात बारावीचा निकाल होणार जाहीर

MH Board 10th and 12th Result: अखेर प्रतीक्षा संपली, पुढील आठवड्यात बारावीचा निकाल होणार जाहीर

कसा पाहाल 10 वी आणि 12 वीचा निकाल…जाणून घ्या सविस्तर माहिती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 जून : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. बारावीचा निकाल (HSC Result 2022) हा पुढच्या आठवड्यात लागेल. हा निकाल 6 किंवा 7 जूनला लागण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल (SSC Result 2022) हा जूनच्या शेवटच्या आठवड्यात लागेल. शालेय शिक्षणमंत्री यांनी याबाबत माहिती दिली. मात्र हे महाराष्ट्र स्टेट बोर्ड दहावीचा निकाल नक्की कुठे बघायचा? कोणत्या वेबसाईट्सवर (Official Websites for Maharashtra SSC Board Result) हा निकाल दिसू शकेल? आणि निकाल बघण्यासाठी नक्की काय क्रेडेन्शियल्सची गरज पडेल? असे प्रश्न आता विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पडू लागले आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ज्या वेबसाईट्सवर दहावीचा निकाल बघता येईल (How to check Maharashtra SSC Board Result 2022) अशा सर्व Websites ची यादी देणार आहोत. तसंच निकाल बघण्याची संपूर्ण प्रोसेस सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. हे ही वाचा- कुठलीच परीक्षा नाही थेट मिळेल सरकारी नोकरी; कशी आणि कुठे? इथे मिळेल उत्तर **‘या’ वेबसाईट्सवर बघता येईल निकाल** 1.  mahresult.nic.in 2.  maharashtraeducation.com 3.  mahahsscboard.maharashtra.gov.in. 4.  sscresult.mkcl.org असा चेक करा निकाल इयत्ता 10वीचा महाराष्ट्र SSC निकाल तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी सुरुवातीला www.mahresult.nic.in या महाराष्ट्र बोर्डाच्या निकाल पोर्टलच्या अधिकृत वेबपेजला भेट द्या.

SSC परीक्षेसाठी MSBSHSE निकालासाठी अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर SSC परीक्षेचा निकाल हा पर्याय येईल ज्यावर विद्यार्थ्यांना पुढील वेब पेजवर भेट देण्यासाठी क्लिक करा. यानंतर आईचे नाव आणि रोल नंबर ही महत्त्वाची क्रेडेन्शियल्स टाकण्यास विसरू नका. विद्यार्थ्यांना दोन्ही आवश्यक क्रेडेन्शियल्स भरावे लागतील आणि नंतर View Result पर्यायावर क्लिक करा. तुमचा निकाल तुमच्या समोर असेल. पुढील रेफरन्ससाठी निकाल डाउनलोड किंवा सेव्ह करून ठेवा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या