JOIN US
मराठी बातम्या / करिअर / मेट्रोत मेगा भरती? मुंबई महा मेट्रोने जाहिरातीबाबत केला खुलासा

मेट्रोत मेगा भरती? मुंबई महा मेट्रोने जाहिरातीबाबत केला खुलासा

मेट्रो २अ आणि मेट्रो ७ मध्ये टेक्निकल पदासाठी मेगा भरती करण्यात येणार येणार असल्याचा दावा करणारी जाहिरात व्हायरल झाली होती.

जाहिरात

metro

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 एप्रिल : मुंबई महा मेट्रोमध्ये मेगा भरती करण्यात येत असल्याची जाहिरात व्हायरल झाली होती. याबाबत आता मुंबई महा मेट्रोकडून खुलासा करण्यात आला आहे. जाहिरात खोटी असून अशा प्रकारची कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नसल्याचं मुंबई महा मेट्रोने म्हटलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या जाहिरातीत काही मोबाईल नंबरही देण्यात आले होते. त्या नंबरवरून फसवणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. दरम्यान, अशी कोणतीच भरती प्रक्रिया सुरू नसल्याचं मुंबई महा मेट्रोने स्पष्ट केलंय. मेट्रो २अ आणि मेट्रो ७ मध्ये टेक्निकल पदासाठी मेगा भरती करण्यात येणार येणार असल्याचा दावा करणारी जाहिरात व्हायरल झाली होती. त्यावर काही मोबाईल नंबरही देण्यात आले होते. मात्र याबाबत शंका असल्यानं आरटीआय कार्यकर्त्यांकडून मुंबई महा मेट्रोकडे यासंदर्भात विचारणा करण्यात आली होती. अखेर मुंबई महा मेट्रोने याबाबत खुलासा केला आहे. बॉस नसलेली नोकरी! महिन्याला एक लाख रुपयांपर्यंत पगार! कामही वर्क फ्रॉम होम

संबंधित बातम्या

मुंबई महा मेट्रोने खुलासा करताना म्हटलं की, आम्हाला असं आढळून आलंय की मुंबई महा मेट्रोल २ अ आणि ७ अंतर्गत भरती असल्याचे मेसेज व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपासून याबाबतची जाहिरात सोशल मीडियावरून प्रसारित होत आहे. ही जाहिरात खोटी आहे. मुंबई मेट्रो अशी कोणतीच भरती प्रक्रिया राबवत नाहीय. त्यामुळे खोट्या मेसेजेस आणि जाहिरातींना बळी पडू नका. आमच्या सर्व जाहिराती या https://www.mmmocl.co.in या संकेतस्थळावर अपलोड केल्या जातात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या