ठाणे शहरातील टॉप 5 शाळा
ठाणे, 09 मार्च: फेब्रुवारी आणि मार्च महिना असल्यामुळे सध्या सर्व शाळांमध्ये आणि विद्यार्थ्यांचा घरात परीक्षेचे (School exams) वारे वाहू लागले आहेत परीक्षा उत्तीर्ण होऊन आपल्या पाल्यांनी चांगल्या शाळेमध्ये प्रवेश (Admissions in best schools) घ्यावा किंवा चांगल्या शाळेत असतील तर पाल्यांनी उत्त्तरोत्तर प्रगती करावी अशी इच्छा प्रत्येक पालकांची असते. त्यात आता परिक्षानंतर पहिली आणि पाचवीच्या प्रवेशांचं (School admissions 2022) सत्र सुरु होणार आहे. आपल्या पाल्यांना चांगल्या शाळेत (Best schools in Maharashtra) प्रवेश मिळावा पालकांमध्ये अक्षरशः शर्यत लागली असते. RTE च्या अंतर्गत प्रवेश (How to get RTE Admissions) मिळवण्यासाठी कित्येक पालक तासंतास शाळांसमोर रांगेत उभे असतात. पण आपल्या मुलांनी चांगल्या शाळेत शिक्षण घ्यावं अशी तुमचीही इच्छा असेल आणि तुम्ही चांगल्या शाळांच्या शोधात (How to get Admission in best school) असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला ठाणे शहरातील टॉप 5 शाळा (Top 5 schools in Thane List) आणि या शाळांबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत. ज्यामुळे तुमच्या पाल्यांना उत्तम शिक्षण घेण्यास (Best educational schools in Thane) मदत होईल. चला तर जाणून घेऊया संपूर्ण लिस्ट (List of best schools in Thane). 1. श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कुल (Smt. Sulochanadevi Singhania School) श्रीमती. सुलोचनादेवी सिंघानिया शाळेची स्थापना 1968 मध्ये प्रसिद्ध व्यक्तिमत्व गोपालकृष्ण सिंघानिया यांनी या पत्नी सुलोचनादेवी यांच्या स्मरणार्थ केली होती, म्हणून हे नाव. शाळेच्या गव्हर्नर मंडळाचे अध्यक्ष दुसरे कोणी नसून रेमंड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. विजयपत सिंघानिया आहेत. ठाणे शहरातील अनेक विद्यार्थी या शाळेत शिकतात आणि अनेक प्रसिद्ध व्यक्ती या शाखेत शिकल्या आहेत. CBSE बोर्डाची ही शाळा आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना चांगल्या सवयींपासून तर स्पोर्ट्स, म्युझिकपर्यंत शिक्षण देण्यात येतं. म्हणूनच ही ठाण्यातील शाळा टॉप शाळांमध्ये येते. विशेष म्हणजे या शाळेत सर्व प्रकारचे स्पोर्ट्स गेम्स खेळण्यासाठी अनेक ग्राउंड्स आहेत.
श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कुल
श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कुल | माहिती |
---|---|
शाळेचा पत्ता | पोखरण रोड नंबर १, जे के ग्राम, ठाणे (पश्चिम) |
शाळेचा फोन क्रमांक | (+91) 022- 4036 84 10 / 11 |
शाळेचा ई-मेल आयडी | info@singhaniaschool.org |
वेबसाईट | http://www.singhaniaschool.org/ |
2. हिरानंदानी फाउंडेशन स्कुल (Hiranandani Foundation School) 1999 मध्ये स्थापन झालेल्या हिरानंदानी फाउंडेशन स्कूलने हळूहळू, परंतु निश्चितपणे ठाण्यातील उत्कृष्ट सह-शैक्षणिक शाळांपैकी एक म्हणून प्रगती केली आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना पर्सनालिटी, शिक्षण, स्पोर्ट्स या प्राप्त्येक गोष्टीसाठी प्रोत्साहन दिलं जातं.तसंच शाळेत इतरही अनेक सुविधा देण्यात येतात. हिरानंदानी फाऊंडेशन शाळेत नर्सरी ते बारावीपर्यंतचे वर्ग चालतात.ICSE बोर्डाची ही शाळा आहे. यामध्ये भाषा, विज्ञान, संगणक प्रयोगशाळा आणि पुस्तकांनी भरपूर ग्रंथालय आहे. शाळेत खेळाचे मैदान, सभागृह, बास्केटबॉल कोर्ट, स्क्वॅश कोर्ट आणि एक स्विमिंग पूल देखील आहे.
हिरानंदानी फाउंडेशन स्कुल
हिरानंदानी फाउंडेशन स्कुल | माहिती |
---|---|
शाळेचा पत्ता | वुड स्ट्रीट,हिरानंदानी इस्टेट,पाटलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे |
शाळेचा फोन क्रमांक | 2225763002 |
शाळेचा ई-मेल आयडी | hfsinternationaladmissions@gmail.com |
वेबसाईट | http://www.hiranandanischools.edu.in/thane/index.php |
3. राम रत्न विद्या मंदिर (Ram Ratna Vidya Mandir) रामरत्न विद्या मंदिर ही ठाण्यातील CBSE बोर्डाची प्रमाणित शाळा आहे. बोर्डिंग आणि डे स्कुल दोन्ही सुविधा या शाळेत उपलब्ध आहेत. ही शाळा शाळा CBSE बोर्डाने ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाचचं अनुसरण करते आणि NCERT ने विकसित केलेल्या राष्ट्रीय अभ्यासक्रमाचं पालन करते.ही शाळा पूर्णतः इंग्लिश मिडीयम शाळा आहे. नृत्यजली इन्स्टिट्यूट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, एज्युकेशन, मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि पर्सनॅलिटी एज्युकेशन या शाळेत शिकवले जातात. रामरत्न विद्या मंदिरात वातानुकूलित आणि हवेशीर वर्गखोल्या आहेत, प्रत्येक वर्गात स्मार्ट बोर्ड्स आहेत. डिजिटल शिक्षण देण्यावर शाळेचा भर आहे.
राम रत्न विद्या मंदिर
राम रत्न विद्या मंदिर | माहिती |
---|---|
शाळेचा पत्ता | केशव सृष्टी, गोराई रोड, उत्तन भाईंदर (प), ठाणे |
शाळेचा फोन क्रमांक | +91-22-28450707, 28450718 |
शाळेचा ई-मेल आयडी | rrvm@ramratnavidyamandir.org |
वेबसाईट - | http://ramratnavidyamandir.org/ |
4. VPM’s डॉ. बेडेकर विद्या मंदिर (VPM’s Bedekar Vidya Mandir) या शाळेत प्रामुख्याने मुलांसाठी उपयुक्त ग्राफिकल आणि व्होकल पुस्तकांची सुसज्ज लायब्ररी आहे.अभ्यासक्रमातील संकल्पना समजावून सांगण्यासाठी मनोरंजनाव्यतिरिक्त बौद्धिक आणि भौतिक खेळण्यांचा समावेश करण्यात आला आहे. वर्गातील सर्व भिंती अभ्यासक्रम तक्ते, चित्रे आणि विविध शैक्षणिक साहित्याने सजवण्यात आल्या आहेत.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वार्षिक कार्यक्रम व क्रीडा महोत्सव आयोजित केले जातात. भारतीय संस्कृती जपण्यासाठी वर्षभर विविध सण साजरे केले जातात. शाळेत Junior, Senior Kindergarten and Nursery सुद्धा आहे.
VPM’s डॉ. बेडेकर विद्या मंदिर
डॉ. बेडेकर विद्या मंदिर | माहिती |
---|---|
शाळेचा पत्ता | डॉ.बेडेकर विद्या मंदिर (माध्यमिक) महात्मा फुले मार्ग, विष्णू नगर, गोखले रोड ऑफ, नौपाडा, ठाणे |
शाळेचा फोन क्रमांक | 022/2542 1776 |
शाळेचा ई-मेल आयडी | vpmt@vsnl.net |
वेबसाईट | https://vpmthane.org/vidya/index.html |
5. SMT’s सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल (SMT’s Saraswati English Medium School) या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षांसोबतच स्पोर्ट्स आणि इतर गोष्टीही शिकवण्यात येतात. हे शाळा संपूर्णतः इंग्लिश मिडीयम शाळा आहे. शाळेतील हवेशीर वर्गखोल्या विद्यार्थ्यांच्या कल्पनेच्या फुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या शोधाची भावना आणि वैज्ञानिक स्वभाव वाढवण्यासाठी डिझाइन केल्या आहेत.या शाळेत प्रशस्त लायब्ररी आणि मैदान आहे. विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी शाळा आणि स्टाफ कटिबद्ध आहेत.
SMT’s सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल
सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल | माहिती |
---|---|
शाळेचा पत्ता | गोखले रोड, समोर. मल्हार टॉकीज, नौपाडा, ठाणे. |
शाळेचा फोन क्रमांक | 022-25434335 / 9137717589 |
शाळेचा ई-मेल आयडी | smtthane.primary@gmail.com |
वेबसाईट | https://primary.smtthane.in |
महत्त्वाची सूचना - शिक्षण घेण्यासाठी कुठलीही शाळा कमी नाही. वरील सर्व शाळा या टॉप म्हणून आमच्यातर्फे निवडण्यात आलेल्या नाहीत. सादर शाळांची प्रसिद्धी आणि त्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता या शाळांची लिस्ट देण्यात आली आहे.