JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Salary Discussion: Interview दरम्यान पगाराबद्दल चर्चा करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात; अन्यथा....

Salary Discussion: Interview दरम्यान पगाराबद्दल चर्चा करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात; अन्यथा....

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्हाला सॅलरी डिस्कशन करताना नक्की कामी येतील. चला तर मग जाणून घेऊया.

जाहिरात

पगाराबद्दल चर्चा करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 09 सप्टेंबर: कोरोनामुळे देशातील तरुणांसाठी जॉबच्या संधी खूप्पप कमी झाल्या आहेत. तर काही क्षेत्रांमध्ये मात्र संधी वाढल्याही आहेत. मात्र शिक्षणाच्या पात्रतानुसार उमेदवारांना पगार मिळू शकत नाहीये अशी अनेक उमेदवारांची तक्रार आहे. जितका पगार पदवीधर उमेदवारांना मिळत आहे तितकाच पगार पदव्युत्तर उमेदवारांनाही मिळत आहे. चांगला पगार मिळवण्यासाठी Job Interview दरम्यान पगाराबद्दल (Job Interview Tips) बोलताना अनेक गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. जर सॅलरी डिस्कशन (How to do Salary Discussion) चांगल्याप्रकारे तुम्ही यशस्वी ठरलात तर तुम्हाला इच्छेनुसार पगार मिळेल हे नक्की. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्हाला सॅलरी डिस्कशन करताना नक्की कामी येतील. चला तर मग जाणून घेऊया. उमेदवाराला त्याचे जॉब प्रोफाइल (Job Profile), मार्केट ट्रेंड आणि वेतनवाढ लक्षात घेऊन अपेक्षित पगार सांगावा लागतो. त्यानंतर एचआर कंपनीचे बजेट आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन उमेदवाराचा पगार अंतिम केला जातो. त्यामुळे सॅलरी डिस्कशनला एक वेगळंच महत्त्वं प्राप्त झालं आहे.\ SBI Clerk परीक्षा देणार आहात? Exam Pattern पासून Syllabus पर्यंत सर्व Details

तुम्ही ज्या वर्क प्रोफाईलसाठी अर्ज केला आहे, त्याचा पगार आणि मार्केटमधील तुमच्या अपेक्षा यांचा आधी विचार करा. तुम्हाला उद्योगातील नोकरीचा कल आणि पगाराची माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही अशा जॉब वेबसाइटची मदत घेऊ शकता, जिथे विविध उद्योगांची माहिती उपलब्ध आहे.

मुलाखतीला जाण्यापूर्वी विचार करा की जर नियोक्ता तुम्हाला मागितलेला पगार मान्य करत नसेल तर तुम्ही किती पगारासाठी सहमत आहात. तुम्ही जो पगार मागितला आहे, तो नियोक्त्याने लगेच मान्य केला पाहिजे असे नाही. तो तुम्हाला त्याच्या वतीने एक निश्चित पगार देऊ करेल आणि तुम्ही तो स्वीकारावा अशी त्याची इच्छा आहे (नोकरीची ऑफर). अशा परिस्थितीत, पगाराची चर्चा करताना, स्वतःसाठी अशी मर्यादा करा, जी तुम्हा दोघांसाठी चांगली असेल. मुलाखतीच्या अगदी सुरुवातीलाच पगाराबद्दल प्रश्नोत्तरे सुरू झाली तर ती टाळण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्हाला नोकरीच्या ऑफरची ठोस पुष्टी मिळत नाही तोपर्यंत पगाराच्या विषयावर स्वतःला छेडू नका. जर मुलाखत घेणार्‍याने तुमच्याशी याबद्दल बोलले तर, थेट उत्तर न देता त्यांच्याकडून पद आणि कामाबद्दल अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करा. Job Alert: SBIमध्ये 5000हून अधिक जागांसाठी भरती; कुठे कराल अर्ज?

मुलाखतीला जाण्यापूर्वी स्वतःला प्रामाणिकपणे विचारा - तुमचा पगार जास्त महत्त्वाचा आहे की काम. जर एखाद्या कंपनीत तुम्हाला कमी पगार मिळत असेल पण मानसिक शांतता, स्वातंत्र्य किंवा इतर विशेष सुविधा असतील तर कदाचित तुम्ही पगाराच्या बाबतीत थोडी तडजोड करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या