JOIN US
मराठी बातम्या / करिअर / JoSAA Counselling: IIT आणि NIT कॉलेज प्रवेशासाठी आजपासून सुरु होणार काउन्सिलिंग; या आहेत IMP तारखा

JoSAA Counselling: IIT आणि NIT कॉलेज प्रवेशासाठी आजपासून सुरु होणार काउन्सिलिंग; या आहेत IMP तारखा

केंद्रीय अर्थसहाय्यित तांत्रिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी जॉइंट सीट ऍलोकेशन अथॉरिटी (JoSAA) आजपासून ऑनलाइन काउन्सिलिंग सुरू करणार आहे.

जाहिरात

आजपासून सुरु होणार काउन्सिलिंग

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19, जून: भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) आणि इतर केंद्रीय अर्थसहाय्यित तांत्रिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी जॉइंट सीट ऍलोकेशन अथॉरिटी (JoSAA) आजपासून ऑनलाइन काउन्सिलिंग सुरू करणार आहे. उमेदवार 19 जूनपासून नोंदणी करू शकतात, निवडी भरू शकतात आणि जे आर्किटेक्चर अॅप्टिट्यूड टेस्ट (AAT) साठी उपस्थित असतील ते AAT निकाल जाहीर झाल्यानंतर 24 जूनपासून त्यांच्या AAT-विशिष्ट निवडी भरू शकणार आहेत. 24 जून रोजी रात्री 8 वाजेपर्यंत उमेदवारांनी भरलेल्या निवडींच्या आधारे पहिली मॉक वाटप यादी 25 जून रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. यानंतर 26 जून रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत पूर्ण झालेल्या उमेदवारांच्या नोंदींच्या आधारे 27 जून रोजी दुसरी मॉक वाटप यादी प्रसिद्ध केली जाईल. 28 जून रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत नोंदणी आणि निवड भरता येईल. पहिल्या फेरीतील जागावाटपाचा निकाल 30 जून रोजी सकाळी 10 वाजता जाहीर होणार आहे. Career Point: ‘साउंड’ म्हणजे फक्त गाणंच नाही तर या क्षेत्रात आहेत अनेक मोठ्या संधी; असं करा करिअर; A-Z माहिती सहा फेऱ्यांमध्ये होणार काउन्सिलिंग एकूणच, JoSAA काउन्सिलिंग 2023 सहा फेऱ्यांमध्ये आयोजित केले जाईल, त्यानंतर CSAB फेऱ्या होतील. CSAB फेऱ्या फक्त NIT+ प्रणाली अंतर्गत असलेल्या जागांसाठी आहेत IIT साठी नाही. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट jossa.nic.in ला भेट द्यावी लागणार आहे. 12वी पास झालात ना? मग थेट सरकारी नोकरी घ्या ना; वन विभागात तब्बल 2138 जागांसाठी मेगाभरती; घ्या Link असा तपासा JoSAA सीट वाटपाचा निकाल JoSAA काउन्सिलिंग 2023: JoSAA सीट वाटपाचा निकाल कसा तपासायचा सर्वप्रथम Josaa.nic.in या JoSAA च्या वेबसाईटला भेट द्या. JoSAA सीट वाटपाच्या लिंकवर येथे क्लिक करा. लॉगिन क्रेडेन्शियल्स एंटर करा. JoSAA जागा वाटपाचा निकाल स्क्रीनवर उपलब्ध होईल. JoSAA 2023 जागा वाटप पत्र डाउनलोड करा आणि सेव्ह करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या