'या' तारखेला जारी होणार Admit Cards
मुंबई, 30 एप्रिल: दरवर्षी लाखो विद्यार्थी JEE Mains परीक्षा (JEE Mains Exam 2022) देतात. बारावीनंतर कोणत्याही टेक्निकल आणि इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये प्रवेश (How to get admission in Engineering) मिळवण्यासाठी या परीक्षेचे मार्क्स महत्त्वाचे असतात. म्हणूनच अनेक विद्यार्थी यासाठी प्रचंड मेहनत करत असतात. आपल्यालाच चांगलं कॉलेज मिळावं यासाठी प्रत्येक विषयाचा जीवतोड अभ्यास करत असतात. यंदा ही परीक्षा लवकरच होणार आहे. यासाठी विद्यार्थी मेहनत करत आहेत. मात्र JEE परीक्षेला (JEE mains preparation tips) अवघे काही दिवस शिल्लक असताना विद्यार्थ्यांनी नक्की कसा अभ्यास (How to study for JEE mains) करावा ही आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हीही JEE mains 2022 परीक्षा (JEE Mains Exam 2022 study tips) देणार असल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. चला तर जाणून घेऊया. JEE Advanced 2022: विद्यार्थ्यांनो, पात्रतेपासून तर काही महत्त्वाच्या तारखांपर्यंत इथे मिळेल संपूर्ण माहिती; जाणून घ्या 20 ते 29 जून 2022 या JEE मुख्य परीक्षाच्या सत्र 1 साठी तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, जेईई परीक्षा 2022 च्या तयारीसाठी विद्यार्थ्यांकडे जास्त वेळ शिल्लक नाही. दरम्यान, अनेक विद्यार्थी त्यांच्या 12वी बोर्ड परीक्षेची तयारीही करत आहेत. 2022 मध्ये JEE परीक्षा प्रक्रियेत अनेक बदल करण्यात आले आहेत. नक्की कशी करावी JEE परीक्षेची जर तुम्ही या वर्षीच्या JEE मुख्य परीक्षेला (JEE Mains 2022) बसणार असाल तर तुमच्याकडे तयारीसाठी जास्त वेळ नाही. अशा परिस्थितीत, या टिप्स (जेईई परीक्षा टिप्स) लक्षात ठेवून, आपली तयारी सुधारा- जेईई परीक्षेच्या तयारीदरम्यान, अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. मॉक टेस्ट आणि मागील वर्षांचे पेपर सोडवून तुम्ही वेळ व्यवस्थापनाची कला शिकू शकता. तुम्हीही IAS होण्याचं स्वप्नं बघताय? मग UPSC परीक्षेबद्दल ही माहिती असणं आवश्यक जेईई परीक्षेत यशस्वी होण्यासाठी, आपण जवळजवळ सर्व प्रश्न कमी वेळेत सोडवणे आवश्यक आहे परंतु वेग वाढवण्याच्या प्रयत्नात अनावश्यक चुका करू नका. अभ्यासाच्या वेळापत्रकाच्या मध्यभागी ब्रेक घेणे देखील आवश्यक आहे. यामुळे तयारी करताना कंटाळा येणार नाही आणि मूडही फ्रेश राहील. जेईई नमुना पेपरसह सराव करून, तुम्ही परीक्षेचा नमुना चांगल्या प्रकारे समजू शकता. यावरून प्रश्नांच्या पातळीचीही कल्पना येते.