JOIN US
मराठी बातम्या / करिअर / IOCL Recruitment 2023 : आयओसीएलमध्ये 50 हजारांची नोकरी; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड; लगेच करा अर्ज

IOCL Recruitment 2023 : आयओसीएलमध्ये 50 हजारांची नोकरी; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड; लगेच करा अर्ज

IOCL Recruitment 2023 : तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असेल तर तुमच्यासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे.

जाहिरात

आयओसीएलमध्ये 50 हजारांची नोकरी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 जून : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) हा भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मालकीचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. या अंतर्गत देशातील इंधन गरजेची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जातो. आयओसीएलला आपला कारभार सुरळीत चालवण्याठी कुशल मनुष्यबळाची गरज भासते. आताही कंपनीनं केमिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंग शाखांतील ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिस इंजिनीअर (अभियंता/अधिकारी) पदांसाठी पात्र भारतीय उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. आयओसीएल 2023 च्या भरती अधिसूचनेनुसार, ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिस इंजिनीअर पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार GATE 2023 या परीक्षेसाठी बसलेले पाहिजेत किंवा त्यांनी ती परीक्षा पास केलेली पाहिजे. निवडलेल्या उमेदवारांना 50 हजार रुपये मासिक वेतन दिलं जाईल. पोस्टचं नाव: आयओसीएल 2023 च्या भरती अधिसूचनेनुसार, आयओसीएलमध्ये ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिस इंजिनीअर पदांसाठी इच्छुक उमेवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. आयओसीएलमधील केमिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंग शाखांमध्ये ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिस इंजिनीअरची पदं रिक्त आहेत. पात्रता: इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या संबंधित विषयांमध्ये AICTE/UGC द्वारे मान्यताप्राप्त संस्था/महाविद्यालये/विद्यापीठे/डीम्ड विद्यापीठांमधून पूर्णवेळ नियमित अभ्यासक्रम म्हणून बी.टेक./बीई/समकक्ष पदवी मिळवलेली असावी. जे उमेदवार सध्या रोबोटिक्स किंवा मेकॅट्रॉनिक्स सारख्या एकत्रित, एकात्मिक किंवा क्रॉस-डिसिप्लिनरी विषयामध्ये त्यांची बॅचलर पदवी (बीई/बी.टेक) पूर्ण करत आहेत किंवा आधीच त्यांनी पदवी मिळवलेली आहे. ते या नोकरीसाठी पात्र असणार नाहीत. वर सूचीबद्ध केलेल्या व्यतिरिक्त इतर विषयांतील उमेदवार ज्यांच्याकडे बीई/बी.टेक पदवी आहे ते अर्ज करण्यास अपात्र आहेत. वरती दिलेल्या सूचीबाहेर असलेल्या अभियांत्रिकी शाखांतील उमेदवार नोकरीसाठी पात्र आहेत की नाही याबद्दल अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार महामंडळाला आहे. वाचा - देशात आयुर्वेदाला वाढतेय प्रचंड मागणी; हे टॉप कोर्सेस कराल तर लाईफ होईल सेट ज्या उमेदवारांनी वरीलपैकी एका शाखेत बी.टेक./बीई पदवी मिळवलेली आहे आणि एकात्मिक अभ्यासक्रम किंवा ड्युअल डिग्री प्रोग्रॅमचा भाग म्हणून सध्या एम.टेक करत आहेत ते या नोकरीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. अशा उमेदवारांची कंपनीनं निवड केल्यास त्यांच्याकडे 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बीई/बी टेक आणि एमई/एम टेक पदवी असणं गरजेचं आहे. जे उमेदवार सध्या त्यांच्या पात्रता पदवीच्या शेवटच्या वर्षात किंवा सेमिस्टरमध्ये शिकत आहेत तेदेखील अर्ज करण्यास पात्र आहेत. पण, त्यासाठी त्यांना सर्व सेमिस्टरमध्ये मिळवलेल्या एकूण गुणांपैकी किमान वर नमूद केलेले गुण असले पाहिजेत. त्यांची कंपनीनं निवड केल्यास, त्यांना इतर सर्व पात्रता अर्टी पूर्ण करण्याव्यतिरिक्त, पात्रता परीक्षेतील गुणांची त्यांची एकत्रित टक्केवारी वर नमूद केलेल्या गुणांच्या किमान टक्केवारीएवढी किंवा जास्त असेल तरच त्यांना नोकरीच्या ठिकाणी येण्याची परवानगी दिली जाईल. अशा उमेदवारांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत त्यांची फायनल ग्रेडशीट देखील जमा करता आली पाहिजे. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवार अधिकृत अधिसूचना बघू शकतात. वयोमर्यादा: आयओसीएल 2023 च्या भरती अधिसूचनेनुसार, आयओसीएलमध्ये ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिस इंजिनीअर पदांसाठी इच्छुक उमेवारांचं वय 26 वर्षांपेक्षा कमी असलं पाहिजे. वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी इच्छुक उमेदवार अधिकृत अधिसूचना बघू शकतात. वेतन: आयओसीएल 2023 च्या भरती अधिसूचनेनुसार, निवडलेल्या उमेदवारांना 50 हजार रुपये मासिक वेतन मिळेल, याशिवाय, निवडलेल्या उमेदवारांना महामंडळाच्या नियमांनुसार आणि वेळोवेळी सुधारित केल्यानुसार महागाई भत्ता (डीए) आणि इतर भत्ते मिळतील. इतर भत्ते/लाभांमध्ये एचआरए/अनुदानित गृहनिर्माण (पोस्टिंगच्या जागेवर अवलंबून), वैद्यकीय सुविधा, ग्रॅच्युइटी, अंशदायी भविष्य निर्वाह निधी, कर्मचारी पेन्शन योजना, ग्रुप पर्सनल अॅक्सिडेंट इन्शुरन्स स्कीम, रजा रोखीकरण, रजा प्रवास सवलत (एलटीसी)/ एलएफए, महामंडळाच्या नियमांनुसार अंशदायी सेवानिवृत्ती लाभ निधी योजना, कन्व्हेयन्स अॅडव्हान्स/देखभाल प्रतिपूर्ती, कामगिरी संबंधित वेतन (पीआरपी) यांचा समावेश होतो. वाचा - तब्बल 1,85,000 रुपये महिन्याचा पगार आणि जॉबसाठी परीक्षाच नाही; इथे होतेय भरती निवड प्रक्रिया: गेट 2023 परीक्षेतील गुण, वैयक्तिक मुलाखत, गट चर्चा, आणि ग्रुप टास्कद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांच्या शॉर्टलिस्टिंगमध्ये जीडी, जीटी आणि पीआय यांचा समावेश असेल आणि शॉर्टलिस्टिंग हे संबंधित विषयासाठी गेट 2023 परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या उतरत्या क्रमाने त्यांना शॉर्टलिस्ट केलं जाईल. अर्ज कसा करावा: आयओसीएल 2023 च्या भरती अधिसूचनेनुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना शेवटच्या तारखेला किंवा त्या पूर्वी अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करावा लागेल. इतर कोणत्याही स्वरुपात अर्ज स्वीकारला जाणार नाही. सर्व उमेदवारांनी अधिसूचने दिलेल्या पात्रता अटी व इतर माहिती वाचून घ्यावी व नंतरच अर्ज भरावा. ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2023 आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या