JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Infosys चे CEO सलील पारेख यांची पगारवाढ बघून चक्रावून जाल; 43 कोटींहून इतकं मिळालं Hike

Infosys चे CEO सलील पारेख यांची पगारवाढ बघून चक्रावून जाल; 43 कोटींहून इतकं मिळालं Hike

नुकतीच Infosys कंपनीचे CEO सलील पारेख (salil parekh Infosys ceo) यांची पगारवाढ झाली आहे. मात्र त्यांना मिळालेली ही पगारवाढ चर्चेचा विषय ठरली आहे.

जाहिरात

Infosys कंपनीचे CEO सलील पारेख

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 मे: जगभरातील टॉप कंपन्या आणि त्यांच्या CEO ना मिळणाऱ्या पगाराबद्दल आपल्याला माहितीच आहे. या कंपन्यांमध्ये अनेक IT कंपन्यांचा नंबर लागतो. यामध्ये काही कंपन्या भारतातील आहेत. जितका पगार या कंपन्यांच्या CEO ना मिळतो याबद्दल आपल्याला कल्पना नसते. मात्र यांचा पगार कोट्यवधी रुपयांमध्ये असतो. मात्र नुकतीच Infosys कंपनीचे CEO सलील पारेख (salil parekh Infosys ceo) यांची पगारवाढ झाली आहे. मात्र त्यांना मिळालेली ही पगारवाढ चर्चेचा विषय ठरली आहे. देशातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसने त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सलील पारेख यांना मोठी वेतनवाढ दिली आहे. एका वर्षात त्यांचा पगार 43 टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीने त्याचे वार्षिक वेतन 49.68 कोटींवरून 71.02 कोटी रुपये केले आहे. इन्फोसिसने ही माहिती शेअर बाजाराला दिली आहे. सलील पारेख यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने चमकदार कामगिरी केल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीचा महसूल आर्थिक वर्ष 2018 मध्ये 70,522 कोटी रुपयांवरून वाढून आर्थिक वर्ष 2022 मध्ये 1,21,641 कोटी रुपये झाला. Exam Tips: परीक्षेतील MCQ प्रश्नांना घाबरून जाऊ नका; असा बिनधास्त सोडवा पेपर

कार्यकाळही वाढवला

नुकतेच कंपनीने त्यांचा कार्यकाळ आणखी 5 वर्षांसाठी वाढवण्याची घोषणा केली होती. पारेख यांची 1 जुलै 2022 ते 31 मार्च 2027 पर्यंत पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार, सलील पारेख यांच्या नेतृत्वाखाली कंपनीचा एकूण भागधारक परतावा 314 टक्के राहिला आहे. आयटी कंपन्यांमध्ये हा प्रतिस्पर्धी सर्वाधिक आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, आर्थिक वर्ष 2018 मधील 16029 कोटी रुपयांवरून नफ्यात वाढ होऊन ते आर्थिक वर्ष 2022 मध्ये 22110 कोटी रुपये झाले. टीसीएस प्रमुखांना टाकलं मागे सलील पारेख यांनी पगारवाढीमध्ये देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसचे प्रमुख राजेश गोपीनाथन यांनाही मागे टाकले आहे. कंपनीच्या वार्षिक अहवालात नुकत्याच प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार, TCS मुख्य कार्यकारी राजेश गोपीनाथन यांचा पगार आर्थिक वर्ष 2022 मध्ये सुमारे 26.6 टक्क्यांनी वाढून 25.77 कोटी रुपये झाला आहे. अभिमानास्पद! 26 वर्षीय कॅप्टन अभिलाषा आर्मीत पहिल्या महिला लढाऊ हेलिकॉप्टर चालक कोण आहेत सलील पारेख सलील पारेख यांना IT उद्योगात 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्यांनी जानेवारी 2018 मध्ये इन्फोसिसचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून पदभार स्वीकारला. याआधी त्यांनी कॅपजेमिनीमध्ये 25 वर्षे काम केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या