Home /News /career /

Exam Tips: कोणत्याही परीक्षेतील MCQ प्रश्नांना घाबरून जाऊ नका; असा बिनधास्त सोडवा पेपर

Exam Tips: कोणत्याही परीक्षेतील MCQ प्रश्नांना घाबरून जाऊ नका; असा बिनधास्त सोडवा पेपर

आज आम्ही तुमहाला असे काही टिप्स (Tips to solve MCQ) सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही बिनधास्त Multiple Choice Questions सोडवू शकाल. चला तर मग जाणून घेऊया.

  मुंबई, 25 मे: बऱ्याचदा स्पर्धा परीक्षांच्या (Competitive exams) वेळी विद्यार्थ्यांना भीती वाटत असते. या भीतीचं प्रमुख कारण म्हणजे Multiple Choice Questions. यामध्ये एका प्रश्न कमीत कमी चार पर्याय दिले असतात, यापैकी योग्य तो पर्याय निवडून आपल्याला उत्तर द्यावं लागतं. मात्र अनेकदा विद्यार्थी परीक्षेचा अभ्यास न करून परीक्षेला जातात त्यामुळे ते अशा पद्धतीच्या प्रश्नांमध्ये नापास होतात. मात्र आता चिंता करू नका आज आम्ही तुमहाला असे काही टिप्स (Tips to solve MCQ) सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही बिनधास्त Multiple Choice Questions सोडवू शकाल. चला तर मग जाणून घेऊया. प्रश्न पूर्ण वाचा सर्व प्रथम, संपूर्ण प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि नंतर त्या प्रश्नाचे पर्याय वाचा. विद्यार्थी बरेचदा अर्धा प्रश्न वाचल्यानंतर किंवा थोडक्यात प्रश्न वाचल्यानंतर उत्तर सिलेक्ट करतात आणि या घाईमुळे बर्‍याच वेळा चुकीचं उत्तर सिलेक्ट केलं जातं. म्हणूनच, संपूर्ण प्रश्न वाचूनच समोर जा. सावधान! ऑनलाईन जॉब शोधताना 'या' चुका कधीच करू नका; अन्यथा निर्माण होईल धोका
  उत्तराचे सर्व पर्याय वाचा
  उत्तर देण्यापूर्वी त्या प्रश्नाचे सर्व पर्याय एकदा वाचा. बर्‍याचदा सर्व MCQ मध्ये एक योग्य उत्तर तसंच एक उत्तम उत्तराचा पर्याय असतो आणि आपण उत्तराचे सर्व पर्याय न वाचता घाईत चुकीचं उत्तर सिलेक्ट करतो. यामुळे गडबड होऊ शकते. म्हणूनच पर्याय नक्की वाचा. उत्तर आधी आपल्या मनात आणा कोणतीही MCQ वाचण्यापूर्वी प्रथम त्याच्या उत्तरांचा विचार मनात आणा कारण असं केल्यानं आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर निवडण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. सावधान! ऑनलाईन जॉब शोधताना 'या' चुका कधीच करू नका; अन्यथा निर्माण होईल धोका विचारपूर्वक उत्तर द्या ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला ठाऊक नाहीत त्यांचा विचार केल्यावर या प्रश्नांची उत्तरं सिलेक्ट करा. बर्‍याच वेळा असं केल्यानं आपल्याला योग्य उत्तराची कल्पना येते.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Board Exam, Career, Career opportunities, Exam Fever 2022

  पुढील बातम्या