नेव्ही अग्निवीर भरती
मुंबई, 23 जून : केंद्र सरकारची ‘अग्निवीर’ योजना सुरू झाल्यापासून सतत काहीना काही कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. या योजनेच्या माध्यमातून भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांमध्ये दोन वर्षांच्या कालावधीसाठी तरुणांना सेवेत घेतलं जात आहे. भारतीय नौदलाने अग्निवीर पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार भारतीय नौदलाच्या joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे 35 पदं भरण्यात येणार आहेत. ‘हिंदुस्थान टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. नोंदणी प्रक्रिया 26 जून रोजी सुरू होईल. नोंदणी प्रक्रियेसाठी 2 जुलै हा शेवटचा दिवस असेल. शैक्षणिक पात्रता: नौदलात अग्निवीर होण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारानं, सरकारच्या शिक्षण मंत्रालयानं मान्यता दिलेल्या शालेय शिक्षण मंडळांमधून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवाराचा जन्म 1 नोव्हेंबर 2002 ते 30 एप्रिल 2006 दरम्यान झालेला असावा. फक्त अविवाहित पुरुष आणि अविवाहित महिला उमेदवार नौदलामध्ये अग्निवीर म्हणून नावनोंदणीसाठी पात्र आहेत. Western Railway Recruitment: 1-2 नाही तर तब्बल 3624 जागा अन् पात्रता फक्त 10वी; रेल्वेत मेगाभरतीची घोषणा निवड प्रक्रिया: प्राथमिक स्क्रीनिंग चाचणी आणि अंतिम स्क्रीनिंग चाचणीमधील कामगिरीच्या गुणवत्ताक्रमानुसार पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. प्राथमिक चाचणीमध्ये शारीरिक तपासणी केली जाईल. उमेदवार त्यासाठी पात्र असणं बंधनकारक आहे. सर्व बाबतीत अंतिम तपासणीसाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल. ही यादी तयार करताना रिक्त पदसंख्यादेखील विचारात घेतली जाईल. अधिक संबंधित तपशीलांसाठी इच्छुक उमेदवार भारतीय नौदलाची अधिकृत साइट पाहू शकतात. PMC Recruitment: तुम्हीही ग्रॅज्युएट आहात? टायपिंगही येतं? मग पुणे महापालिकेत जॉबची संधी सोडूच नका; करा अप्लाय महत्त्वाच्या तारखा: अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची: 26 जून 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 2 जुलै 2023 गुणवत्ता यादी प्रकाशित होण्याची तारीख: ऑक्टोबर 2023 Railway Jobs: रेल्वेत नोकरी हवीये ना? मग असा अभ्यास कराल तर एका झटक्यात मिळेल सरकारी नोकरी भारतीय नौदलाला जागतिक स्तरावर मानाचं स्थान आहे. देशाची सागरी सीमा सुरक्षित रहावी यासाठी हे दल काम करतं. त्यासाठी, नौदलाला कुशल मनुष्यबळाची गरज भासते. या पूर्वीदेखील भारतीय नौदलात अग्निवीर भरती करण्यात आले आहेत. डिसेंबर 2022मध्ये घोषणा झालेल्या या भरतीच्या माध्यमातून भारतीय नौदलात प्रथमच महिला खलाशांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) पासिंग आउट परेडला संबोधित करताना चीफ अॅडमिरल आर. हरिकुमार यांनी ही माहिती दिली होती.