अशी असेल भरती प्रक्रिया
मुंबई, 28 जून: अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय हवाई दलात (Indian Air Force) नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना आता सुवर्णसंधी उपलब्ध करण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाने ‘अग्निवीर वायू भरती प्रक्रिया-2022’ (IAF Agniveer Vayu Recruitment 2022) साठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक असलेले पात्र उमेदवार विविध पदांसाठी भारतीय हवाई दलाच्या careerindianairforce.cdac.in आणि agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाईटना भेट देऊन अर्ज करू शकतात. भारतीय लष्कराने अग्निवीर भरती रॅलीचे वेळापत्रक (Indian Army Agniveer Bharti Rally 2022) जाहीर केले आहे. त्यानुसार ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात अग्निवीर भरतीसाठी रॅलीची प्रक्रिया सुरू होईल. उमेदवार joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन पूर्ण वेळापत्रक तपासू शकतात. वेगवेगळ्या राज्यांमध्ये होणाऱ्या रॅलींचे वेळापत्रक लष्कराने जाहीर केले आहे. सुरूवातीचं जाॅब पॅकेजच 10 लाखांचं असणार; फक्त ‘हा’ कोर्स करावा पूर्ण लागणार
महाराष्ट्राची गोष्ट करायची झाली तर पुणे RTG झोन दरम्यान मुंबई, नागपूर, कोल्हापूर, या शहरांमध्ये भरती होणार आहे. साधारणतः ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान निरनिराळ्या तारखांना शहरांप्रमाणे महाराष्ट्रात अग्निवीरांची निवड केली जाणार आहे.
उमेदवारांना संपूर्ण वेळापत्रक तपासण्यासाठी वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दिलेली मार्गदर्शक तत्त्वे काळजीपूर्वक वाचा. मात्र, सध्या या तारखा तात्पुरत्या आहेत आणि परिस्थितीनुसार त्या बदलू शकतात, असे जारी नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की पहिल्या फेरीत भारतीय लष्कराकडून 25000 अग्निवीरांची भरती केली जाईल. उमेदवार खाली दिलेल्या थेट लिंकवरून रॅलीसाठी जारी केलेली अधिसूचना वाचू शकतात. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. काय असेल पगार आणि सुविधा नोकरी मिळाल्यानंतर उमेदवारांना पहिल्या वर्षी दरमहा 30,000 रुपये पगार असेल. त्यात 21,000 रुपये इनहँड पगार (In hand Salary ) तर दरमहा 9,000 रुपये भारत सरकारच्या कॉर्पस फंडमध्ये (Corpus Fund) जमा होईल. दुसऱ्या वर्षी पगार दरमहा 33,000 रुपयांवर जाईल. त्यात 23,100 रुपये हातात मिळतील. तर 9,900 कॉर्पस फंडमध्ये जातील. तिसऱ्या वर्षी पगार दरमहा 36,500 असेल. यातील 25,550 रुपये हातात मिळतील आणि 10,950 रुपये कॉर्पस फंडमध्ये जाणार आहेत. चौथ्या वर्षी मासिक पगार दरमहा 40,000 रुपये असणार आहे. यातील 28,000 रुपयांची रक्कम हाती मिळेल आणि दरमहा 12,000 रुपये कॉर्पस फंडमध्ये जमा होणार आहेत.