गुगल मॅपवरून साभार...
फी किती असेल? फी विद्यापीठाच्या नियमानुसार असून त्यामध्ये विद्यापीठाच्या मान्यतेने बदल केला जाऊ शकतो. यावर्षी किमान 120 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. विद्यापीठाच्या तसेच सरकारच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ घेता येईल. वाचा: 'एकनाथ शिंदे माझे चांगले मित्र', संजय राऊत अचानक नरमले विद्यार्थ्यांना सुविधा काय आहेत? फॅसिलिटीहोस्टेल, लायब्ररीज, लॅबोरेटरीज या सुविधा आहेत. शासनाच्या नियमानुसार सर्वप्रकारच्या फेलोशिप्स आणि स्कॉलरशीप्स घेण्यासाठी प्रोत्साहन दिल्या जाते. शिक्षण घेतल्यानंतर जॉबच्या संधी कुठे? विद्यार्थ्यांसाठी मल्टिनॅशनल कंपनीत किंवा पब्लिक सेक्टरमध्ये नोकरी, शिक्षक, संशोधनार्थी म्हणून निवड, उच्च शिक्षणासाठी जागतिक मानांकनांच्या विद्यापीठांमध्ये प्रवेश किंवा स्वतःचा व्यवसाय यापैकी कोणत्याही क्षेत्रात करिअर करता येते. तसेच प्लेसमेंट मायक्रोसॉफ्ट, गुगलपासून आयटी लीडिंग कंपनी, सिंटेल, एलअँडटी, Accenture, अशा अनेक आणि विविध कंपन्यांमध्ये संधी आहेत.वाचा: BREAKING : 3 दिवसांमध्ये 160 जीआर, राज्यपालांनी मागितला सरकारकडे खुलासा
पगार किती मिळतो कंपनीतील उमेदवारीच्या काळात दाखवलेल्या कामानुसार वार्षिक पॅकेज 7 ते 10 लाख सुरुवातीला असते. हा पगार पुढे अनुभवानुसार वाढत जातो. दरवर्षी जवळपास शंभर टक्के विद्यार्थ्यांना कुठे ना कुठे जॉब मिळतोच असे विभागाचे रेकॉर्ड आहे. तसेच फेलोशिप्स 35 ते 45 हजर रुपये महिना या प्रमाणे मिळतात. काय म्हणतात विभागप्रमुख ज्योत्स्ना दिंगरदिवे म्हणाल्या की, एम.एस.सी कॉम्प्युटर सायन्स विद्यार्थ्यांना कोर्सेस मार्फत खूप साऱ्या सुविधा मिळणार आहेत. तसेच या कोर्सच विद्यार्थ्यांना भरपूर फायदा मिळनार आहे. कोर्स पूर्ण झाल्यानंतर चांगल्या नोकरीचा संधी आहेत. दरवर्षी कुठेना कुठे तरी जॉब मिळतोच हा आज पर्यंतचां रेकॉर्ड आहे. चांगल्या प्रकारच्या नोकरीची हमी आहे. ग्लोबल स्तरावर विविध संधी आहेत. शिक्षण घेत घेत पैसे कमवण्याच्या संधी आहेत.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Education, Maharashtra News, Mumbai, जॉब