JOIN US
मराठी बातम्या / करिअर / देशात येणार सरकारी नोकऱ्यांची लाट; इंडिया पोस्ट तर्फे तब्बल 1 लाख जागांसाठी मेगाभरतीची घोषणा; असं करा अप्लाय

देशात येणार सरकारी नोकऱ्यांची लाट; इंडिया पोस्ट तर्फे तब्बल 1 लाख जागांसाठी मेगाभरतीची घोषणा; असं करा अप्लाय

भारतीय टपाल विभागात (India Post recruitment 2022) एक लाखाहून अधिक पदं रिक्त आहेत. म्हणूनच आता केंद्र सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

जाहिरात

इंडिया पोस्ट 1 लाख जागांसाठी मेगाभरती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 ऑगस्ट: देशातील सरकारी नोकरीची तयारी करत असणाऱ्या लाखो तरुण तरुणींसाठी मोठी खूशखबर आहे. भारतीय टपाल विभागात (India Post recruitment 2022) एक लाखाहून अधिक पदं रिक्त आहेत. म्हणूनच आता केंद्र सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. सरकारने देशभरातील 23 मंडळांमध्ये रिक्त पदे मंजूर केली आहेत. त्यामुळे आता देशातील सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तब्बल एक लाख उमेदवारांना जॉब्स मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोणत्या पदांच्या किती जागा इंडिया पोस्टने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार काही पदांच्या जागा खालीलप्रमाणे आहेत.

JOB TITLEएकूण जागा 
पोस्टमन59,099 जागा
मेल गार्ड1445 जागा
मल्टी-टास्किंग पोस्ट37,539 जागा

यासोबतच स्टेनोग्राफरची पदेही मंडळनिहाय मंजूर करण्यात आली आहेत. महाराष्ट्र मध्येही या सर्व पदांसाठी जागा रिक्त आहेत. तब्बल 2 लाख 20 हजार रुपये पगार आणि इतर बऱ्याच सुविधा; AIIMS मध्ये ‘या’ पदांसाठी आहेत बंपर ओपनिंग्स महाराष्ट्रात किती जागा

JOB TITLEएकूण जागा 
पोस्टमन 9884 जागा
मेल गार्ड  147 जागा
मल्टी-टास्किंग पोस्ट 5478  जागा

काय असतील पात्रतेचे निकष या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार दहावी उत्तीर्ण असले पाहिजेत आणि त्यांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी, उमेदवारांनी इंटर किंवा इयत्ता 12 वी पूर्ण केलेली असावी. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना पदाचा किमानसंबंधित अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा भारतीय टपाल विभागाच्या नियमांनुसार या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांचे किमान वय किमान 18 वर्षे आणि कमाल 32 वर्षांपर्यंत असणं आवश्यक आहे. कोणत्या राज्यात किती जागा अशा पद्धतीन करा अप्लाय इंडिया पोस्ट -indiapost.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा मुख्यपृष्ठावरील भर्ती लिंकवर क्लिक करा तुम्हाला अर्ज करायचे असलेले पोस्ट निवडा, पात्रता निकष तपासा स्वतःची नोंदणी करा फॉर्म भरा फी भरा आणि सबमिट करा पुढील वापरासाठी पोचपावती फॉर्म डाउनलोड करा, सेव्ह करा आणि प्रिंट आउट घ्या. फ्रेशर्सना TATA कम्युनिकेशन्स देणार जॉबचं मोठ्ठं गिफ्ट; पुण्यात मिळेल नोकरी ही पदे मेल मोटर सेवा विभाग, टपाल सेवा गट ब पदे, सहाय्यक अधीक्षक पदे, निरीक्षक आणि पोस्टल ऑपरेटिव्ह विभागामध्ये उपलब्ध आहेत. पोस्टमन, मेल गार्ड, स्टेनोग्राफर, मल्टी टास्किंग स्टॉप, सेव्हिंग बँक कंट्रोल ऑर्गनायझेशनशी संबंधित पदे आणि रेल्वे मेल सेवा अंतर्गत प्रादेशिक कार्यालये यासारख्या खालील संवर्गाच्या पदांसाठी किती पदे मंजूर केली जात आहेत याचा उल्लेख या अधिसूचनेत करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या