JOIN US
मराठी बातम्या / करिअर / आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर; थेट IIT मधून करता येईल BTech; पण कसं? वाचा

आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर; थेट IIT मधून करता येईल BTech; पण कसं? वाचा

आयआयटी हैदराबादने हा अनोखा प्रोग्राम लाँच केला आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना थेट आर्टस्मधून बीटेकला प्रवेश मिळू शकणार आहे.

जाहिरात

थेट IIT मधून करता येईल BTech

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 मे: आर्टस् विषयातून बारावी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जर तुम्ही आर्टस् मधून बारावी केलं असेल आणि तुम्हाला कंप्यूटर सायन्समध्ये ग्रॅज्युएशन करायचं असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. आयआयटी हैदराबादने हा अनोखा प्रोग्राम लाँच केला आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना थेट आर्टस्मधून बीटेकला प्रवेश मिळू शकणार आहे. देशात प्रथमच ह्युमॅटीनीटीज आणि सामाजिक विज्ञान पार्श्वभूमी असलेले विद्यार्थी संगणक विज्ञान शाखेत बी.टेक. हा अनोखा कार्यक्रम आयआयटी हैदराबादने देऊ केला आहे. मानविकी आणि सामाजिक विज्ञान विषयांसह बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचे आयआयटी हैदराबादचे उद्दिष्ट आहे. PCMC Recruitment: महापालिकेत नोकरीसाठी ना परीक्षा ना टेस्ट; थेट मिळेल जॉब; या दिवशी मुलाखत आयआयटी हैदराबादच्या म्हणण्यानुसार, या ड्युअल डिग्री प्रोग्राममध्ये 12वीमध्ये चांगले गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. यामध्ये एक कोर्स बी.टेक इन कॉम्प्युटर सायन्सचा आहे. तर दुसरा मास्टर ऑफ सायन्स बाय रिसर्च इन कॉम्प्युटेशनल नॅचरल सायन्स (CNS) आहे. CNS प्रोग्रामसाठी, गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात 90% पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. गणितात किमान पात्रता गुण 85% आहेत. त्यासोबत इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, इंग्रजी किंवा समाजशास्त्र यापैकी एक असायला हवे होते. महिन्याचा तब्बल 1,32,300 रुपये पगार अन् पात्रता फक्त 7वी-10वी; राज्याच्या या विभागात सरकारी नोकरी; करा अप्लाय बोर्ड परीक्षा आणि मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे विद्यार्थ्यांचे प्रवेश केले जातील. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणिताचा मानक अभ्यासक्रम असावा. कॅल्क्युलससह. व्यवसाय किंवा वाणिज्य गणित नाही. Maharashtra SSC Result 2023: दहावीत मार्क्स कमी पडलेत तरी टेन्शन घेऊ नका; आधी ‘या’ 3 लोकांना जाऊन भेटा या अभ्यासक्रमाबाबत, आयआयटी हैदराबादचे संचालक प्रोफेसर पीजे नारायण सांगतात की, संगणक विज्ञान किंवा संगणकीय विषयातील पदवीधरांनी विकसित केलेल्या प्रणाली आणि साधनांचा वापर तांत्रिकदृष्ट्या नसलेले लोक करतात. म्हणूनच प्रणाली अशा प्रकारे तयार केली गेली पाहिजे की ती अधिक लोकांसाठी कार्य करेल. तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांना व्यक्ती आणि समाज प्रणालींशी कसा संवाद साधतात याचे सखोल ज्ञान असले पाहिजे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या