JOIN US
मराठी बातम्या / करिअर / ICMR Recruitment : आयसीएमआरमध्ये 50 हजार रुपयांच्या नोकरीची संधी; `या` पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

ICMR Recruitment : आयसीएमआरमध्ये 50 हजार रुपयांच्या नोकरीची संधी; `या` पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Government Job : तुमच्याकडे कम्प्युटर सायन्स, माहिती तंत्रज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी असेल तर तुम्हाला चांगल्या नोकरीची संधी आहे.

जाहिरात

आयसीएमआर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जून : तुम्ही जर कम्प्युटर सायन्स, माहिती तंत्रज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली असेल आणि चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरमध्ये प्रोजेक्ट सायंटिस्ट - I या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पदव्युत्तर पदवीधारक किंवा बीटेक उत्तीर्ण युवक या पदासाठी अर्ज करू शकतात. या पदासाठी आयसीएमआरने शैक्षणिक, कामाचा अनुभव आणि वयोमर्यादेसंदर्भात निकष निश्चित केले आहेत. त्याबाबत सविस्तर जाणून घेऊया. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरमध्ये प्रोजेक्ट सायंटिस्ट-I या एका रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहेत. यासंदर्भात आयसीएमआरने अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. आयसीएमआरच्या अधिसूचनेनुसार, प्रोजेक्ट सायंटिस्ट - I या पदासाठी इच्छुक उमेदवाराने कम्प्युटर सायन्स, माहिती तंत्रज्ञान किंवा तत्सम विषयात पदव्युत्तर पदवी फर्स्ट क्लासमध्ये मिळवलेली असावी. तसेच त्याला दोन वर्षांचा अनुभव असावा किंवा उमेदवाराने कम्प्युटर सायन्स, माहिती तंत्रज्ञान अथवा तत्सम विषयात सेकंड क्लासमध्ये पदव्युत्तर पदवीसह पीएचडी प्राप्त केलेली असावी. बीटेक उत्तीर्ण उमेदवारही या पदासाठी अर्ज करू शकतात. या उमेदवारांनी कम्प्युटर सायन्स, माहिती तंत्रज्ञान किंवा तत्सम विषयांत बीटेक केलेलं असावं तसेच त्यांना चार वर्षांचा अनुभव असावा. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराचे वय 35 पेक्षा जास्त नसावे. वयोमर्यादेची कट-ऑफ डेट ही अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार असेल, याची इच्छुक उमेदवारांनी नोंद घ्यावी. वाचा - रोज फक्त तीन तास काम अन् मिळते तब्बल सव्वा लाख रुपये सॅलरी; हा जॉब कराल का? प्रोजेक्ट सायंटिस्ट - I या पदावर पात्र उमेदवारास तात्पुरत्या कराराच्या आधारे आणि एक वर्ष कालावधीसाठी को-टर्मिनस बेसिसवर नियुक्त केले जाईल. प्रोजेक्ट सायंटिस्ट - I पदावर निवड झालेल्या उमेदवारास दरमहा 54,300 रुपये वेतन दिले जाईल. जी व्यक्ती नियमित वेतनावर सेवेत आहेत किंवा शासनाच्या कोणत्याही विभागात किंवा संस्थेत कार्यरत आहेत, अशा व्यक्ती या पदासाठी अर्ज करू शकणार नाहीत. आयसीएमआरच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या पदासाठीचा अर्ज आयसीएमआरच्या अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्यावा. त्यानंतर पूर्ण भरलेला अर्ज icmrhqrcn@gmail.com या ईमेलवर 4 जुलै 2023 रोजी सायंकाळी 5 वाजण्यापूर्वी पाठवावा. अंतिम मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी आयसीएमआरची अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या