लवकरच जाहीर होणार CA परीक्षेचा निकाल
मुंबई, 03 जुलै: ICAI CA फायनल, इंटर रिझल्ट 2023: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट इंडिया, लवकरच CA इंटरमीडिएट आणि फायनल निकाल प्रसिद्ध करणार आहे. ICAI अधिकारी धीरज खंडेलवाल यांच्या ट्विटनुसार, दोन्ही निकाल येत्या आठवड्यात अपेक्षित आहे, उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर हा निकाल चेक करता येणार आहे. हा निकाल ऑनलाईन कसा बघता येणार हे जाणून घेऊया. ज्या विद्यार्थ्यांनी या वर्षी ICAI CA फायनल आणि इंटरमिजिएट परीक्षा दिली आहे ते अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध झाल्यानंतर त्यांचे निकाल पाहू शकतील. ICAI अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, तो 5 किंवा 6 जुलै रोजी उपलब्ध होईल असा अंदाज आहे, परंतु संस्थेकडून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला आहे. AIIMS Recruitment: 10वी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी AIIMS मध्ये बंपर ओपनिंग्स; पात्र असाल तर ही घ्या डायरेक्ट लिंक असा चेक करा तुमचा निकाल ICAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. सीए इंटरमीडिएट निकाल पर्यायावर क्लिक करा. तुमचा ICAI नोंदणी क्रमांक/पिन आणि रोल नंबर वापरून लॉगिन करा. कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि सबमिट बटण दाबा. सीए इंटरचा निकाल मे 2023 तुमच्या स्क्रीनवर दिसेल. उमेदवार त्यांचे गुण तपासू शकतात आणि जून सत्रासाठी सीए इंटरमिजिएट निकाल डाउनलोड करू शकतात. भविष्यातील संदर्भासाठी CA इंटरमिजिएट 2023 च्या निकालाची प्रिंटआउट घ्या बाबो! ना जॉब ना बिझनेस तरीही अवघ्या 25 वर्षांच्या वयात कमावली 820 कोटींची संपत्ती; कोणी आणि कशी? ICAI CA इंटरमीडिएट परीक्षेची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती, गट 1 मे 3, 6, 8 आणि 10, 2023 रोजी आणि गट 2 मे 12, 14, 16 आणि 18, 2023 . CA अंतिम परीक्षा 2, 4, 7 आणि 9 मे 2023 रोजी गट 1 आणि 11, 13, 15 आणि 17 मे 2023 रोजी गट 2 आयोजित करण्यात आली होती. या दोन्ही निकाल लवकरच उपलब्ध होतील. 24, 26, 28 आणि 30 जून 2023 रोजी, ICAI ने CA फाउंडेशन जून 2023 ची परीक्षा घेतली. फाउंडेशन कोर्सचे निकाल योग्य वेळी जाहीर केले जातील.