IBPS RRB Recruitment 2022
ibpsनवी दिल्ली, 30 जून : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन या संस्थेने (The Institute of Banking Personnel Selection) लिपिक पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. त्याअंतर्गत साडेसहा हजारांपेक्षा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी 1 जुलै 2022 पासून इच्छुकांना अर्ज करता येणार आहे. IBPS ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, लिपिक पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ibps.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. यंदा लिपिकांच्या 6500 हून अधिक पदांची भरती केली जाणार आहे. IBPS बँक लिपिक पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. इच्छुकांना 1 जुलैपासून यासाठी अर्ज करता येईल. या संदर्भातलं वृत्त ‘टीव्ही 9 हिंदी’ने दिलं आहे. सरकारी बँकांमधल्या लिपिकांच्या रिक्त पदांसाठी (IBPS Clerk Recruitment 2022) ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै 2022 आहे. IBPS सप्टेंबर महिन्यात या रिक्त पदांसाठी प्रीलिम परीक्षा आयोजित करेल. मुख्य परीक्षा (Mains) ऑक्टोबरमध्ये होईल, अशी शक्यता आहे. सध्या या रिक्त पदांसाठी IBPSने शॉर्ट नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं आहे. IBPS Clerk साठी पात्रता काय? लिपिक पदांसाठी अर्ज करणार्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असावी. महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही शाखेतले पदवीधर (Any Graduate) उमेदवार या रिक्त पदावर अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 20 वर्षांपेक्षा जास्त आणि 28 वर्षांपेक्षा कमी असावं. तसंच आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्या उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. पोलीस भरतीसाठी सरकारकडून नियमांमध्ये मोठा बदल; द्यावी लागणार ‘मैदानी’ परीक्षा IBPS Clerk Recruitment साठी अर्ज कसा करायचा? - लिपिक पदासाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम ibps.in या अधिकृत वेबसाइटवर जा. - तिथे वेबसाइटच्या होम पेजवरच्या Latest Notification वर जा. - तिथे IBPS Clerk XII Recruitment 2022 Online Form 2022 च्या लिंकवर क्लिक करा. - आता Click here for New Registration या लिंकवर जा. - तिथे विचारलेली माहिती भरून रजिस्ट्रेशन करा. - आता मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा. - लॉगिन केल्यानंतर Application Form भरा. - अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, एक प्रिंट आउट घ्या. अर्ज फी किती? IBPS ने प्रसिद्ध केलेल्या या रिक्त पदांसाठी अर्ज करणार्या जनरल आणि OBC उमेदवारांना 850 रुपये अर्ज फी भरावी लागेल. एससी, एसटी आणि पीएच श्रेणीतल्या उमेदवारांसाठी अर्ज फी 175 रुपये ठेवण्यात आली आहे. तुम्हीही या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर एक ते 21 जुलै यादरम्यान तुम्ही अर्ज करू शकता.