लखनऊ, 21 जून : डोळ्यात फक्त UPSC परीक्षा देण्याचं स्वप्न आणि आपल्या कठोर मेहनतीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षेत 242 वा क्रमांक मिळवणाऱ्या कुलदीप द्विवेदी यांच्या संघर्षाची प्रेरणादायी कहाणी काय आहे हे जाणून घेणार आहोत. लखनऊ इथे साधारण कुटुंबात कुलदीप यांचा जन्म झाला. वडील सिक्युरिटी गार्डची नोकरी करायचे. कुलदीप यांना चार भाऊ-बहिण होते. कमवणारा एक आणि खाणारे ज्यादा अशा स्थितीत पोटभर जेवण मिळण्यासाठीही संघर्ष करावा लागत होता.त्यांचे वडील सूर्यकांत द्विवेदी लखनऊ विद्यापीठात सिक्युरिटी गार्डची नोकरी करायचे. त्यावेळी कुलदीपच्या वडिलांना अकराशे रुपये पगार मिळत असे. मुलं मोठी होत होती तसा शिक्षणाचा खर्चही वाढत होता. मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून कुलदीप यांचे वडील आपलं काम सांभांळून शेतीची कामं कऱण्यासाठी जायचे. मुलांसाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. कुलदीप द्विवाडी यांनी 2009 रोजी अलाहाबाद विद्यापीठातून पदवी घेतली. 2011 रोजी ते पदव्युत्तर झाले आणि त्यांनी परीक्षेची तयारी सुरू केली होती. अलाहाबादमध्ये राहून त्यांनी UPSCची तयारी सुरू केली. यावेळी त्याच्याकडे मोबाइल नव्हता. ते पीसीओद्वारे त्यांच्या कुटुंबीयांना खुशाली कळवायचे. त्यामुळे त्यांचा बराच वेळ वाया न जाता अभ्यासात जायचा. आपलं लक्ष्य कायम UPSC एवढंच ठेवल्यामुळे ते अभ्यासात गुंग असायचे. 2015 रोजी त्यांनी पहिल्यांदा UPSCची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी 242 वा क्रमांक मिळवला. 2016 रोजी नागपुरात त्यांचं ट्रेनिगं सुरू झालं त्यांचं पहिलं पोस्टिंग काश्मीरमध्ये इनकम टॅक्स ऑफिसर म्हणून करण्यात आलं. हे वाचा- उधारी घेऊन केली UPSC ची तयारी, शेतकऱ्यांचा मुलगा झाला IAS हे वाचा- UPSC Prelims Exam 2020 : 31 मे ला होणारी प्रीलिम कॅन्सल, नवी तारीख कधी? हे वाचा- वडिलांना झाला कॅन्सर, अवघ्या 22 व्या वर्षी तरुणीनं IAS परीक्षेत मिळवलं अव्वल यश