JOIN US
मराठी बातम्या / करिअर / JEE Exam: उमेदवारांनो, JEE साठी आताही करू शकता अप्लाय; जाणून घ्या संपूर्ण अप्लिकेशन प्रोसेस

JEE Exam: उमेदवारांनो, JEE साठी आताही करू शकता अप्लाय; जाणून घ्या संपूर्ण अप्लिकेशन प्रोसेस

अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे आणि पूर्वी अर्ज करू शकले नाहीत ते आता नोंदणी (How to register for JEE mains Exam 2022) करू शकतात.

जाहिरात

'या' तारखेला जारी होणार Admit Cards

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 एप्रिल: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जून 2022 सत्रासाठी मुख्य संयुक्त प्रवेश परीक्षेची म्हणजेच JEE मेनची अर्ज प्रक्रिया (JEE mains Exams Application Process) पुन्हा सुरू केली आहे. ज्या अर्जदारांना BE, BTech, B Arch आणि B नियोजन इत्यादी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे आणि पूर्वी अर्ज करू शकले नाहीत ते आता नोंदणी (How to register for JEE mains Exam 2022) करू शकतात. JEE Mains 2022 जून सत्रासाठी नोंदणीच्या विशेष विंडोची शेवटची तारीख म्हणजे पहिला टप्पा 25 एप्रिल आहे. दोन टप्प्यांमध्ये होणार JEE परीक्षा इच्छुक उमेदवारांनी jeemain.nta.nic.in वर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जाशी संबंधित संपूर्ण प्रक्रिया या बातमीत येथे स्पष्ट केली आहे. जेईई मेन 2022 या वर्षी दोन फेऱ्यांमध्ये घेण्यात येणार आहे. जेईई मेन 2022 चा पहिला टप्पा 20 जून ते 29 जून, दुसरा टप्पा 21 जुलै ते 30 जुलै या कालावधीत आयोजित केला जाईल. ऑनलाइन JEE 2022 अर्ज भरण्यासोबत, उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. तथापि, आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्कात सूट दिली जाईल. मोठी बातमी! MHT CET Exam 2022 पुढे ढकलली; ‘या’ कारणांमुळे घेतला निर्णय

JEE मेन 2022 नोंदणी फॉर्म पुन्हा उघडण्याची घोषणा करताना, NTA ने एका निवेदनात म्हटले आहे की परीक्षेच्या शहराची आगाऊ सूचना, प्रवेशपत्र डाउनलोड करण्याच्या तारखा आणि निकाल जाहीर करणे योग्य वेळी JEE मेनच्या पोर्टलवर प्रदर्शित केले जाईल. JEE मुख्य परीक्षा 2022 सत्र-2 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेचे वेळापत्रक नंतर सुरू केले जाईल. उमेदवारांनी नोंद घ्यावी की त्यांना अर्ज प्रक्रियेदरम्यान पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि स्कॅन केलेली स्वाक्षरी देखील अपलोड करावी लागेल. या तारखांना JEE मेन 2022 ची परीक्षा

जेईई मेन 2022 फेज I साठी नवीन तारखा: जून 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28 आणि 29 जून 2022 असणार आहेत. तर जेईई मेन 2022 दुसऱ्या टप्प्यासाठी नवीन तारखा: 21 जुलै, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30 जुलै 2022 असणार आहेत. CBSE Exams: विद्यार्थ्यांनो, Science च्या पेपरचं टेन्शन घेऊ नका; असा करा अभ्यास अशा पद्धतीनं करा अर्ज सर्वप्रथम उमेदवार अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट देतात. आता मुख्यपृष्ठावर दिसणार्‍या नोंदणीच्या लिंकवर क्लिक करा. आता विनंती केलेली माहिती टाकून स्वतःची नोंदणी करा. आता आयडी पासवर्डद्वारे लॉगिन करा आणि अर्ज भरा. आता आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. आता अर्जाची फी भरा आणि सबमिट करा. अर्ज डाउनलोड करा आणि पुढील आवश्यकतेसाठी त्याची प्रिंट आउट घ्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या