12वीनंतर टुरिझम इंडस्ट्रीमध्ये असं करा करिअर
मुंबई, 05 जुलै: तुम्हालाही जगभरात फिरायला आवडत? रमणीय ठिकाणं बघायला आणि त्यांच्याबद्दल लोकांना सांगायला आवडतं? मग तुमच्यासाठी कारवर सर्वात मोठी संधी निर्माण होऊ शकते. प्रवासाची आवड असलेल्या लोकांसाठी, पर्यटन क्षेत्र देखील कमाईच्या बाबतीत खूप चांगलं आहे. पण या क्षेत्रात नक्की करिअर करणार तरी कसं? यात शिक्षण कसं आणि कोणतं घेणार जाणून घेऊया. Govt Jobs Without Exam: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळतात ‘हे’ सरकारी जॉब्स; एकदा सिलेक्ट झालात की लाईफ सेट या क्षेत्रात काम करण्यासाठी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर या क्षेत्राचा अभ्यास करावा लागतो. अभ्यास पूर्ण झाल्यावर तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट ऑफर करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत.तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मित्रांपासून ते तुमच्या ओळखीच्या प्रत्येकासाठी प्रवास योजना बनवू शकता. पर्यटन हे असे क्षेत्र आहे जिथे नेहमीच भरभराट असत. तसंच कोरोनानंतर या क्षेत्राला प्रचंड मागणी वाढली आहे. त्यामुळे या क्षेत्रात लाखो रुपये कमावण्याची संधी आहे. IRCTC Recruitment: एकही परीक्षा नाही थेट होईल मुलाखत; रेल्वेत मिळेल 35,000 रुपये सॅलरीची नोकरी दिवाळी, होळी, दसरा आणि ख्रिसमसच्या सुट्ट्यांव्यतिरिक्त उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये लोक अनेकदा बाहेरगावी जाण्याचा बेत आखतात. अशा परिस्थितीत लोक उत्तम योजनेसाठी पर्यटन तज्ज्ञांचा सल्ला घेतात. त्यासाठी पर्यटन तज्ज्ञाला चांगले पैसे मिळतात. तुम्हीही या क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे.
बारावीनंतर करा हा कोर्स पर्यटन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 12वी उत्तीर्ण झाल्यावर तुम्हाला पर्यटन प्रशासनात बीए किंवा बीबीए पदवी घ्यावी लागेल. यानंतर तुम्ही पदव्युत्तर पदवीमध्ये ट्रॅव्हल आणि टुरिझममध्ये एमबीए करू शकता. पदवी घेऊ इच्छिणारे असे विद्यार्थी कमी वेळात ट्रॅव्हल आणि टुरिझममध्ये डिप्लोमा करू शकतात. अभ्यासासाठी, तुम्ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, ग्वाल्हेर, आयआयटीएम नेल्लोर, ईआयटीएम भुवनेश्वर, क्राइस्ट युनिव्हर्सिटी, बंगलोर आणि जामिया सारख्या देशातील प्रमुख संस्थांमध्ये प्रवेश घेऊ शकता.