JOIN US
मराठी बातम्या / करिअर / पालकांनो, परीक्षेत मुलांनी चांगले मार्क्स मिळवावे असं वाटतंय? मग मुलांना लावा 'या' IMP सवयी; एकदा वाचाच

पालकांनो, परीक्षेत मुलांनी चांगले मार्क्स मिळवावे असं वाटतंय? मग मुलांना लावा 'या' IMP सवयी; एकदा वाचाच

आज आम्ही अशा काही चांगल्या सवयींबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या मुलांना लावाल तर ते परीक्षेत नक्की यशस्वी (How to help children for study) होतील.

जाहिरात

6. तुमचा संगणक किंवा लॅपटॉप स्टडी रूमच्या आग्नेय कोनात ठेवा. त्यासाठी ही योग्य जागा आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 मार्च: आपली स्मरणशक्ती (Memory Power) परिपूर्ण असावी असे प्रत्येकाला वाटते. मात्र, आजकालच्या मुलांमध्ये लहानपणापासूनच गोष्टी विसरण्याची तक्रार होऊ लागली आहे. काही वेळापूर्वी वाचलेल्या गोष्टीही नीट आठवत नाहीत. हे तुमच्यासोबत किंवा तुमच्या मुलाच्या बाबतीतही होत असेल, तर आता परीक्षेपूर्वी काही गोष्टी (How to grow children memory) बदलण्याची गरज आहे (healthy habits for memory), जेणेकरून स्मरणशक्ती वाढवता (How to treat memory of students) येईल. बहुतेक पालकांना त्यांच्या मुलांची स्मरणशक्ती कशी वाढवायची (tips for Parents) हे जाणून घ्यायचे असते. म्हणूनच आज आम्ही अशा काही चांगल्या सवयींबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या मुलांना लावाल तर ते परीक्षेत नक्की यशस्वी (How to help children for study) होतील. चला तर मग जाणून घेऊया. जीवनशैलीत काही छोटे बदल करून तुमची स्मरणशक्ती सुधारू शकते. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी स्मरणशक्ती मजबूत असणे अत्यंत आवश्यक आहे. यापासून ते अभ्यासापर्यंत इतर क्षेत्रातही आपला झेंडा उंचावण्यास मदत होऊ शकते. जाणून घ्या अशा काही अभ्यास टिप्स, ज्याद्वारे लहानपणापासूनच मुलांची स्मरणशक्ती वाढवता येते. नक्की कशी असते CMAT Exam? पॅटर्नपासून अप्लाय लिंकपर्यंत इथे मिळेल माहिती मुलांकडे विशेष लक्ष देणं आवश्यक मुलांची शिकण्याची क्षमता वाढवण्यासाठी, ते मनोरंजक बनवणे खूप महत्वाचे आहे. मुलांसाठी पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञानही खूप महत्त्वाचे आहे. विषय अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्यांना विज्ञान संग्रहालये आणि कलादालनांसारख्या ठिकाणी घेऊन जा. त्यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढेल. वास्तविक, व्हिज्युअलायझेशनसह, गोष्टी दीर्घकाळ लक्षात राहतात. मुलांचा स्क्रीन टाइम कमी करा आणि त्यांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहित करा. व्यायाम ठरेल महत्त्वाचा लहान मुले असो वा प्रौढ, प्रत्येकासाठी व्यायाम आवश्यक आहे. यामुळे मन आणि शरीर दोन्ही तंदुरुस्त राहते. दररोज व्यायाम केल्याने किंवा मैदानी खेळ खेळल्याने मुलांच्या स्मरणशक्तीला चालना मिळते आणि त्यांची विचार करण्याची क्षमताही अधिक चांगल्या पद्धतीने विकसित होते. Career Tips: Degree नंतर भरघोस पगाराची नोकरी हवीये; ‘हे’ PG डिप्लोमा कोर्सेस करा रोज ब्रेकही आहे आवश्यक मुलांवर अभ्यासाचे ओझे टाकणे टाळा. गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी मेंदूला थोडा ब्रेक देणे देखील आवश्यक आहे. वास्तविक, मेंदूलाही माहिती साठवण्यासाठी थोडा वेळ हवा असतो. विश्रांती दरम्यान, मुलांना स्नॅक्स, रस किंवा पाणी द्या, त्यांना थोडे फिरायला सांगा किंवा त्यांच्या आवडीचे काहीतरी सुचवा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या