मुंबई, 07 मार्च: कोणत्याही क्षेत्रात करिअर (Career Tips) करायचं असेल तर त्या क्षेत्राबद्दलची संपूर्ण माहिती असणं आवश्यक असतं. यानंतर एकदा नोकरी लागल्यानंतर त्या क्षेत्रात टिकून राहण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची स्पर्धा सुरु होते. मात्र यामध्ये अनेकजण चुकीचे ठरतात. कित्येकांना हे जमत नाही. जर तुम्हाला करिअरमध्ये (how to get success in career) सतत समोर जात राहायचं असेल तर हे बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या केल्यानंतर तुम्ही करिअरमध्ये कधीच थांबणार (success in Career) नाही आणि सतत प्रगती करत राहाल. चला तर मग जाणून घेऊया. टेक्नो फ्रेंडली व्हा उत्तम करिअरसाठी तुम्हाला टेक्नो फ्रेंडली असण्याची गरज आहे. आज स्पर्धा इतकी वाढली आहे की नवीन तंत्रज्ञान नाकारता येत नाही. तुमच्या क्षेत्राशी संबंधित तंत्रज्ञानाचे चांगले ज्ञान असावे. यासोबतच नवनवीन तंत्रज्ञान शिकत राहा. HR मुलाखतीदरम्यान विचारले जाऊ शकतात ‘हे’ प्रश्न; अशा पद्धतीनं द्या उत्तरं इतरांशी चांगले वागा तुमची वागणूक हा तुमचा आरसा आहे, त्यामुळे इतरांशी चांगले वागायला शिका. तुम्ही लोकांशी चांगले वागलात तर लोक तुमच्यासारखेच नाहीतर लोक तुमच्यापासून दूर पळू लागतात. याशिवाय तुमची चांगली वागणूक तुमच्यासाठी प्रगतीचा मार्ग उघडते, त्यामुळे इतरांशी चांगले वागायला शिका. स्वतःला नेहमी अपडेट करत राहा आजकाल मोबाईल अॅप्स देखील स्वतःला अपडेट करण्यासाठी बोलतात, त्यामुळे तुम्हीही वेळेनुसार स्वतःला बदलत राहणं गरजेचं आहे. करिअरच्या बाजारपेठेत आपले मूल्य टिकवून ठेवण्यासाठी, स्वतःला अपडेट करत राहणे खूप महत्वाचे आहे. प्लॅन B नक्की ठेवा असे अनेकवेळा घडते जेव्हा तुमचे करिअरमध्ये घेतलेले निर्णय चुकीचे सिद्ध होऊ लागतात, अशा वेळी प्लॅन ‘बी’ तुमच्यासोबत ठेवा जेणेकरून तुमचा प्लॅन ‘बी’ वेळ आल्यावर कामी येईल. दोन-तीन करिअर प्लॅन्स तुमच्यासोबत ठेवल्याने तुमच्या अपयशाची शक्यता कमी होते. बोर्डाच्या परीक्षेदरम्यान संपूर्ण राज्यात Internet सेवा ठप्प; या राज्याचा निर्णय आपली प्रतिभा ओळखा पुस्तकी ज्ञानाच्या जोरावर उत्तम करिअर किंवा नोकरीची अपेक्षा करता येईल अशी आजची वेळ नाही. आता काळ बदलला आहे, आता पुस्तकी किडा बनून किंवा पदव्यांचा ढीग करून करिअर घडवता येत नाही. जर तुम्हाला उत्तम करिअर घडवायचे असेल तर तुम्हाला स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची आणि तुमच्यातील प्रतिभा शोधण्याची गरज आहे. एकदा का तुमच्यात लपलेले टॅलेंट सापडले की मग तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्या क्षेत्रात इतर लोकांपेक्षा चांगले स्थान मिळवू शकता.